ShareChat
click to see wallet page
#कथाविश्व हळूहळू किती अनावश्यक खर्च आपल्या आयुष्यात आलेत बघा... ● टॉयलेट धुण्यासाठी हार्पिक वेगळं, ● बाथरूम धुण्यासाठी वेगळं. ● टॉयलेटची दुर्गंधी घालवण्यासाठी सुगंधी वड्या पण हव्यात. ● कपडे हाताने धुतले तर एक वेगळं वॉशिंग पावडर, आणि मशीनमध्ये धुतले तर खास मशीनसाठी पावडर... (नाहीतर तुमची २०,००० रुपयांची मशीन बादलीपेक्षा काही वेगळी राहणार नाही.) ● आणि हो, कॉलरचा मळ काढण्यासाठी ‘व्हॅनिश’ तर घरात असलंच पाहिजे. ● हात धुण्यासाठी आंघोळीचा साबण वापरायचा नाही, ● लिक्विडच वापरा, साबणाने जीवाणू ‘ट्रान्सफर’ होतात — (म्हणजे कीटकनाशकात कीटक पडलेत अशी गोष्ट झाली!) ● केस धुण्यासाठी शॅम्पू पुरेसा नाही, ● कंडिशनर पण हवाच, ● मग बॉडी लोशन, ● फेस वॉश, ● डिओड्रंट, ● हेअर जेल, ● सनस्क्रीन क्रीम, ● स्क्रब, ● ‘गोरे’ बनवणारी क्रीम — हे सर्व घेणं “आवश्यक” झालं आहे. ● आणि हो, दूध (जे स्वतः शक्तिवर्धक आहे) त्याची शक्ती वाढवण्यासाठी हॉर्लिक्स टाकायला विसरू नका. ● मुलासाठी वेगळा हॉर्लिक्स, ● आईसाठी वेगळा, ● आणि बाबांसाठी तर डिफरेंटच. ● श्वासाची दुर्गंधी घालवण्यासाठी फक्त ब्रश पुरेसा नाही, माउथवॉशने गुळण्या करणेही गरजेचं आहे... म्हणूनच १०–१५ वर्षांपूर्वी ज्या घराचा खर्च ८,००० रुपयांत नीट चालायचा, आज त्याच घराचं बजेट ४०,००० ओलांडतंय! यात सगळा दोष महागाईचा नाही, थोडा आपल्या बदललेल्या विचारसरणीचाही आहे, आणि टीव्हीवर दिवसरात्र दाखवले जाणाऱ्या जाहिरातींचाही परिणाम आहे. विचार करा... मर्यादित साधनांमध्ये स्वदेशी जीवनशैली अवलंबवा.. जितकं शक्य आहे तितकं साधं जीवन जगा! कॉपी पेस्ट #The shopping mart 9764277805,, like products message me कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
The shopping mart
9764277805,, like products message me - { { - ShareChat

More like this