तळाशी जाता जाता आधी अंगावर लाभलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची...
मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा...
पाण्यावर अलंकाराचे ओझ हलकं करायचं...
कालांतराने स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे ....
इतरांनी आपल्यावर चढवलेल्या *श्रद्धेच्या पताका* , दैवत्वाची झालर सोडून द्यायची....
आणि त्याच मातीचा भाग व्हायचं जिथून आपण आलो होतो....
पुन्हा एकदा तितकच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी ....
बाप्पा जाता जाता बरच काही शिकवून जातो..
*विसर्जन*
🙏🙏🙏🌸🌼🌸 #गणपती विसर्जन 2025
