ShareChat
click to see wallet page
२३ सप्टेंबर २०२५ *विचारधारा* #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! #🌻दुर्गा देवी😇 #🙏आई एकविरा 🙏 #🤘मैत्री स्टेट्स #🙏भक्तीमय सकाळ🎬 😊 नवरात्रीचा आज दुसरी माळ. आज आपण एक संकल्प करू; वाईट विचारांपासून दूर राहू. आपले मन फार चंचल असते. आपल्याला ते चांगल्या वाईट विचारांमधून फिरवत असते. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते चांगल्या विचारात कमी व वाईट विचारांमध्ये जास्त रमते. आपल्या मनात सकारात्मक विचार येतात पण नकारात्मक विचार जास्त येतात. आपल्याला त्यांचे आकर्षण वाटते. आपले मन पण त्यातच रमते. तशीच कृती कराविशी वाटते व नकळत आपण त्या विचारांच्या मागे धावतो. *जसे विचार तसे आचार* या उक्तीनुसार आपले वर्तन घडते. म्हणून ठरवून आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहू. चांगले ऐकू, चांगले वाचू, चांगले विचार करू, चांगले वर्तन करू. सवयीने सद्विचारातून सद्वर्तन घडत राहील आणि आपले एक वेगळे व्यक्तिमत्व घडेल. जयहिंद!🇮🇳 _सौ. स्नेहलता स. जगताप._
शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! - ShareChat

More like this