त्याची झालेली अवस्था बघून तिला सर्व काही लक्षात आलं... तिचे डोळे कधी भरून वाहू लागले, तिला ही कळलं नाही.
" इन होठोंकी रौनक उसके पास छोड़कर आई हो ना? " त्याचा प्रश्न पुन्हा कानात गुंजला आणि तिला आठवला परवाचा तो क्षण जेव्हा ऋग्वेद ने तिला किस केलं होतं.
ती त्याच्या कडे अविश्वासाने बघत होती, आणि तो नाराजीने..
त्या डोळ्यात जबरदस्त वेदना जाणवत होती, आणि ती वेदना होती त्याचं हृदय तुटल्याची.
" सर ss... आप... मुझ से...."
" पागलो की तरह चाहता हु तुम्हे, पेहली नजर से, जब तुम्हे एअरपोर्ट पर देखा, जिस दीन तुम पहली बार देहरादून आई थी." तिचे दोन्ही दंड घट्ट पकडून तिच्या डोळ्यांत एकटक बघत तो थरथरत्या आवाजात बोलत होता, त्याचे डोळे अजूनही भरून वाहत होते, आणि त्याचा शब्द न शब्द ऐकून तिचं हृदय पिळवटून निघत होतं.
त्याचं कन्फेशन ऐकून तर तिला धक्काच बसला... ज्याच्या वागण्यातून ती आजवर समजत होती की तो आपला किती राग करतो, पण तो तर आपण त्याला भेटण्या आधी पासूनच आपल्या वर प्रेम करत होता, ते ही वेड्यासारखं प्रेम... जे त्याच्या कृतितून आज तिला स्पष्ट दिसत होतं.
पण या कन्फेशन नंतर त्याच्याशी नेमकं बोलावं तरी काय? तिला काहीच कळत नव्हतं, शब्द जणू रस्ता भटकून हरवून गेले होते.
" लेकीन... आप ने .. तो... पहले ही.. दीन मुझे..." बोलताना ती थरथरत होती, कारण जे काही तिला आज कळलं होतं, तिच्या कल्पनेच्या खूप खूप पलिकडचं होतं, त्यात तो तिच्या इतक्या जवळ होता, की दोघांत फार फार तर इंच दोन इंचाचं अंतर असेल... त्यामुळे धडधड भयंकर वाढली होती, आणि त्याची अवस्था पाहून चांगलीच घाबरली होती ती.
" रित्वी के जाने के बाद पहली बार कोई चेहरा इतना गेहराई से देखा था मैने, और उसे देखते ही मेरे सिने से मेरा दिल गुम हो गया था, मैने खिचकर उसे वापस लाने की कोशिश की, उसे बहोत समझाया की तुम्हे हक नहीं है फिर से किसी को चाहने का, लेकीन वो मेरी एक ना माना... और तुम्हारे पीछे भागता चला गया.
तुम्हे भुलने की कोशिश ही कर रहा था, लेकीन दुसरे ही दीन तुम मेरे सामने खडी थी, मेरी ट्रेनी बनकर.
सोचा अब कमजोर पड गया तो फिर कभी खुद को संभाल नहीं पाऊंगा, इसिलिये तुम्हारी इन्सल्ट की, तुम्हे यहाँ से वापस जाने के लिये कहा... लेकीन तुम्हे हर रोज नजरो के सामने देख कर धीरे धीरे मैं अपने दिल के सामने कमजोर पडता गया, मैं नहीं संभाल पाया अपने दिल को, नहीं रोक पाया उसे तुम्हे चाहने से... नहीं रोक पाया.
हर रोज खुद से एक नई जंग लढी है मैने, बस तुम्हे भुलने के लिये..... लेकीन तुम्हारा खयाल हर दीन मुझ पर हावी होता गया, और मैं हर रोज तुम्हारे प्यार में पागल होता चला गया।
मैं फिर भी मानने को तैयार नहीं था, तुम्हे पागलों की तरह चाहकर भी मानना नहीं चाहता था, क्यू की रित्वी की यादों से दगा नहीं कर सकता था, दोस्तों ने भी समझाया, रसिका, निमिष और तनिष्क, सब ने कहा, नई जिंदगी मिली है, तो पुराने जख्म भुलकर फिर से जिने की कोशिश करो, लेकीन मेरा मन अभी भी गहरी कश्मकश में था, रित्वी को भूलना नहीं चाहता था, और तुम्हे भूल नहीं सकता था।" त्याचा एकेक शब्द ऐकून तिला ही हृदयात खोल वेदना होत होत्या.
" फिर आपकी ऐसी कंडीशन, आय मिन आप तो....."
ती बोलत होती पण तेवढ्यात डोअर बेल वाजली, तसे दोघांनी चमकून एकमेकांकडे बघितलं.
" आय थिंक रसिका होगी... तुम कुछ देर बेड रूम मे रुको, मैं उससे बात कर के आता हुं।" त्याने तिचा हात धरून तिला बेड रूम पर्यंत नेलं, बेड रूम चे दार उघडून आत पाठवलं, आणि बाहेरून दार ओढून घेत त्याने नाक वर ओढत एक मोठा आवंढा गिळला, डोळे पुसले, आणि जाऊन दार उघडलं.
" अभी तक रेडी नहीं हुये? .... और.... ओह माय गॉड रौनक sss तुम्हारे हाथ को क्या हुआ है? " ती शॉक्ड होऊन त्याच्या रक्तबंबाळ झालेल्या हाता कडे बघून तो हात हातात घेत घाबरून बोलली.
" नथिंग... जस्ट किचन मे छोटा सा कट लग गया, नॉट ए बिग डील." तो आवाज नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाला.
" तुम झूठ बोल रहे हो ना? क्या हुआ है मुझे बताओ रौनक." ती पॅनिक होत बोलली.
" नहीं रसिका, ऐसी कोई बात नहीं है, मुझे बस ट्वेंटि मीनिट्स देदो, मैं आता हुं, फिर हम चलते है ओके?" म्हणत त्याने दार लावून घेतलं.
" रौन... क.." तिचे शब्द तिच्या तोंडातच राहिले.
.
.
.
इकडे त्याच्या बेड रूम मधे शिरताच ती बेड वर जाऊन बसली, आता पर्यंत त्याने तिच्या दंडाला इतकं घट्ट पकडून ठेवलं होतं, की तिचा हात खूप दुखायला लागला होता, तिने जॅकेट काढून बेड वर ठेवलं, आणि दंडावर पडलेले काचे बघणार, तोच तिचे लक्ष समोरच्या भिंती वर गेले आणि समोरचे दृश्य पाहून तिला आणखी एक धक्का बसला, काळजात आणखी धस्स झालं जेव्हा खिडकी खालच्या भिंतीवर रक्ताचे डाग दिसले, रक्ताची धार खिडकी पासून खाली पर्यंत आली होती, आणि ते रक्त सुकून गेलं होतं.
ती उठून उभी झाली, खिडकी जवळ चालत जाऊन ती खिडकी चा परदा बाजूला करून बाहेर बघू लागली, तर एक्झॅक्ट ती जागा तिच्या नजरेस पडली जिथे दोन दिवसांपूर्वी ऋग्वेद आणि ती बोलत उभे होते, त्याने तिला तिथे मिठी ही मारली होती.
" शीट्ट !! म्हणजे शिवानी चा अंदाज खरा होता, त्याने इथूनच मला ऋग्वेद सोबत बघितलं, आणि कदाचित इथेच उभा राहून त्याने स्वतःच्या हाताला दुखापत करून घेतली...
का रौनक? का असं केलंस? " आलेला हुंदका तिने आवंढ्या सोबत गिळून घेतला... तिला या क्षणी खूप जास्त गिल्टी फिलिंग येत होती, जेव्हा की तिची या सगळ्यात काहीच चुकी नव्हती.
पुढचा विचार करणार तोच बेड च्या बाजूला खाली नजर गेली, आणि पुन्हा डोळे विस्फारले तिचे, कारण समोर तीसेक रिकाम्या बाटल्या कोपऱ्यात पडून होत्या, काही व्हिस्की तर काही रमच्या, आणि उरलेल्या बियर च्या.
" देवा sss काय अवस्था करून घेतली याने माझ्या मुळे स्वतःची." ती रडक्या स्वरात स्वतःशीच बोलली... आणि दुसऱ्याच क्षणी दार उघडून तो आत आला.
दोघांनी एकमेकांना बघितलं, आणि एकाचवेळी दोघांच्या तोंडून एकसाथ शब्द बाहेर पडले.
" आर यू मॅड? " ती त्या बॉटल्स बघून आणि त्याची झालेली अवस्थाबघून त्याच्या वर हक्काने ओरडली...
पण तो... तिने जॅकेट काढून ठेवल्यावर तिच्या हाफ स्लिव्ह्ज च्या टीशर्ट मुळे तिच्या दंडा वरचा AR चा टॅटू जो आता त्याला दिसला, जो परवा ऋग्वेद ने हट्ट करून तीच्या दंडावर करवून घेतला होता.
.
.
.
.
क्रमशः
"फ्लाय हाय ✈️: मेरी हीर आसमानी💓", वाचा प्रतिलिपि वर :,
https://marathi.pratilipi.com/series/ फ्लाय-हाय-मेरी-हीर-आसमानी-asqsvfxgcu7u?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_series_share
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
#🥰Express Emotion #💔दर्द भरी कहानियां #✍मेरे पसंदीदा लेखक #🪖I ❤️️ इंडियन आर्मी 🇮🇳 #love ishq
