🚆 1 ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंग नियमात मोठा बदल; दलालांची मनमानी थांबणार, जाणून घ्या नवीन नियम
🔸 भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून कोणत्याही ट्रेनच्या जनरल तिकीट बुकिंगसाठी नवीन नियम लागू होणार आहे. या निर्णयामुळे तिकीट बुकिंगमध्ये अधिक पारदर्शकता येईल.
🔸 तसेच दलाल व एजंट्सच्या मनमानीला आळा बसेल ज्यामुळे सामान्य प्रवाशांना सीट मिळण्याची अधिक संधी मिळेल.नवीन नियमानुसार कोणत्याही ट्रेनचे तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी फक्त आधार-प्रमाणित युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक करू शकता
🔸 ज्यांच्याकडे आधार प्रमाणीकरण नाही, त्यांना या महत्त्वपूर्ण 15 मिनिटांच्या वेळेत बुकिंग करता येणार नाही. उदाहरणार्थ जर 15 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:20 वाजता सुरू झाले, तर रात्री 12:35 वाजेपर्यंत केवळ आधार-सत्यापित खात्यातूनच तिकीट बुक करता येईल.
🔸 सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात ट्रेनच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे या काळात सामान्य बुकिंगमध्येही 'तत्काळ बुकिंग' सारखीच गर्दी होते. या नवीन आधार-आधारित नियमामुळे बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन, व्यस्त वेळेतील गैरव्यवहार थांबवण्यास मदत होईल.
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #📢18 सप्टेंबर अपडेट्स🆕 #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स