एकदाच मला विसरून बघ
येवू नकोस स्वप्नात माझ्या
मला तुझ्यातून काढून बघ
सोडून दे मागंच सार
नविन कोड सोडवून बघ
असेल तो रस्ता जुनाच
इथ पण थोड चालून बघ
रडत असेल वर नभ बघ
मोरासारखे जरा नाचून बघ
आठवणीतील मधु कण गोड किती
तू जरा त्याला चाखून बघ
असेन स्मशानात जेंव्हा मी
थोडासा वेळ काढून बघ
ये एकदाच जवळ तेंव्हा तरी
डोळे बंद असतील माझे बघ
गळतील अश्रू थेंब दोन तुझे
कंठ दाटून तुझा येईल बघ
घे मोकळा श्वास एकदाचा
मी चाललो तुला सोडून बघ...! #📝कविता / शायरी/ चारोळी #🥰प्रेम कविता📝 #📝हृदयस्पर्शी मराठी कविता✍🏻
