➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖
*🚦मंगळवारीय 'बाल काव्यस्पर्धा*🚦
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*✍️परीक्षणीय मनोगत*
➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿
*🌨️"मातीमोल सजीवांचे अश्रू.. अन् फुटलेले ढग"; शर्मिला देशमुख*
*〽️मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे परीक्षण*
'जा रे जा पावसा
नको ना बरसू असा,
लहान मुलांचे तर सोड
रडवतोस मोठ्यांनाही कसा?'
*🌨️'येरे येरे पावसा तुला देतो पैसा' म्हणणारे बालपण आपसुकच 'जा रे जा रे पावसा' म्हणण्यास मजबूर होताना सध्या आपण पाहिले. 'जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे' हे बालपणीचे गीत गावेसे जरी सुरुवातीच्या काळात वाटले असले तरी आज मात्र शेतकरी, जनावरे,मुके प्राणी, पक्षी, मजूर यांची व्यथा काळजाला घर करून सोडत आहे. आणि या काळजातून वाहणाऱ्या अश्रूंची किंमत मात्र त्या महान निसर्गापुढे शून्यवत्! तसं खरं पाहिलं तर आपण हे मान्यच करायला हवे, आपण थोडे दिले तर निसर्ग भरभरून देतो. कोणताही भेदभाव न करता. पण त्याचा जर ऱ्हास केला तर कोण आपत्ती ओढावू शकते हे आपण सध्या जाणतच आहोत.*
असो, फुटलेले ढग म्हणजेच ढगफुटी म्हणजे काय थोडक्यात जाणून घेऊया. सर्वसामान्य भाषेत सांगायचे तर 'ढगफुटी' किंवा 'क्लाऊडबर्स्ट' म्हणजे एखाद्या लहान भागात अगदी कमी वेळात अतिप्रचंड पाऊस पडणे. हा शब्द प्रामुख्याने दक्षिण आशियात वापरला जातो. जगभरात इतर ठिकाणी त्याला 'वॉटर बॉम्ब' किंवा 'वेदर बॉम्ब' या नावाने ओळखले जाते. भारतात विशेषतः मान्सूनच्या काळात ढगफुटीचे प्रमाण वाढते. कारण या दिवसात हवेत बाष्पांच प्रमाण आधीच जास्त असतं. ढगफुटीच्या घटना पर्वतीय डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात घडत असल्या तरी त्याला अपवाद आहेत. ढग कुठेही फुटू शकतात. भारतात सर्वसाधारणपणे शंभर मीमी पेक्षा जास्त पाऊस अल्प कालावधीतच झाला की ढगफुटी झाली म्हणतात.
तर या ढगफुटी पासून सजीवाने अर्थातच बुद्धिमान मानवाने स्वसंरक्षण कसे करावे? तर पुनर्वनीकरण आणि हिरवीगार पायाभूत सुविधा म्हणजेच झाडे लावा आणि जास्त पाणी शोषून घेण्यासाठी, मातीची धूप कमी करण्यासाठी, उतार स्थिर करण्यासाठी, हिरवेगार क्षेत्र राखा. ढगफुटीचे परिणाम कमी होण्यास आपसूकच मदत होईल. अंततः
निसर्गच आपला त्राता
निसर्गच दाता
निसर्गच विधाता
करा संवर्धन तयाचे
जपूया भाव पर्यावरणाचे
*🍃आता तुम्ही म्हणाल ढगफुटी झाली म्हणून या लागल्या की ज्ञान पाजळायला. असे काही नाही बरं !प्रथमपासूनच मी सदैव पर्यावरण संरक्षणाचा संदेश लेखणीतून देत असते आणि आमचे राहुल दादा या गोष्टीसाठी खरे कारणीभूत ठरतात. ते विषयच असे चिंतन- मनन करण्याचे देतात आणि मग आपसुकच शब्दांची ढगफुटी होते. आज समूहातील बालमनांचे अश्रूंचे बांध फुटताना पाहिले. जारे जारे पावसा म्हणण्याची वेळ आली.ही खंत! पण काय करणार? काय करणार काय? आता निसर्ग संवर्धन करणार आणि आमचे शिलेदार नक्कीच येरे येरे पावसा म्हणणार .हा विश्वास. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण. चला तर मग उशीर कशाला मिळून जाऊ पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायला. तुर्तास थांबते, धन्यवाद !!!*
➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖
*✍️सौ.शर्मीला देशमुख घुमरे*
*ता.केज,जि.बीड*
*संकलक/सहप्रशासक/परीक्षक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
https://marathi.pratilipi.com/story/ #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं मातीमोल-सजीवांचे-अश्रू-अन्-फुटलेले-ढग-शर्मिला-देशमुख-bi722mkbfwt6?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_share
➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖