ShareChat
click to see wallet page
#तेजस्वी महाराज !! *जय तेजस्वी माऊली !!* 🙏🌺🚩 वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा ९० वा जन्मोत्सव सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत २८ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे त्यासाठी १६५ किंटल गहू पुरी आणि १०० क्विंटल बांगी भाजीच्या प्रसादाची तयारी सुरू आहे. गेली ३८ वर्षांपासून श्री तेजस्वी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा तिर्थक्षेत्र वरोडी येथे साजरा होत आहे वरोडी येथील गुंजकर घराण्यात महाराज श्रींची जन्म झाला बालपण गावातच गेल्यानंतर काही दिवसांनी गायब झाले होते. अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावात त्यांचे वास्तव्य राहिले आहे त्यांच्या आगमनाची चाहूल अनेक भक्तांनी अनुभवली आणि तेथूनच त्यांच्या दिव्यंगाची ख्याती वाढली. महाराज श्री गावाकडे परत आल्यानंतर ज्या ज्या गावात त्यांचे वास्तव्य राहिले येथील भाविक वरोडी येथे येऊन महाराज श्रींचा आशिर्वाद घेतल्याशिवाय जात नसत. तेथूनच गावातील नागरिकांनी महाराज श्रींसाठी खोली तयार करून राहण्याची व्यवस्था केली. आज ३८ बरोडी येथे भव्य संस्थान उभे राहिले. तिर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने संस्थांची प्रगती झाली. आज येथे भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. २१ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात अनेक किर्तनकारांनी आपली सेवा समर्पित केली. तर संगीत भागवत कथेचे विमोचन ह भ प डॉ. अनिरुद्ध महाराज क्षिरसागर उर्फ नित्यानंद स्वामी आळंदी यांनी केले ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व ह भ प शंकर महाराज देवकर आणि ह भ प एकनाथ महाराज इंगळे यांनी केले आज २८ नोव्हेंबर रोजी अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ नोव्हेंबर पासून शेकडो महिला व पुरुष भाविक महाप्रसाद तयार करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यांना सहकार्य म्हणून कै भास्करराव शिंगणे विद्यालय गुंज येथील शिक्षक व विद्यार्थी सहकार्य करीत आहेत. या संपूर्ण सोहळ्याची व्यवस्था संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे, जनार्दन गुंजकर, उत्सवटा समितीचे अध्यक्ष दिनकरराव देशमुख आणि संस्थानचे उपाध्यक्ष, विश्वस्त, अ उत्सव समितीचे संचालक चोख व्यवस्था पाहात आहे. २८ ला सकाळी ७ वाजता ज परमहंस श्री तेजस्वी महाराज यांची भव्य मिरवणूक वरोडी नगरीतून काढण्यात येणार असून या मिरवणुकीत शेकडो महिला भजनी मंडळ, दिंड्या सहभागी मि होणार आहे. *जय तेजस्वी माऊली !!* 🙏🌺🚩
तेजस्वी महाराज !! - ShareChat
01:00

More like this