!! दिपोत्सवात दादा तुम्ही गेला सोडुनी
आणि वाटले दुपारी अस्तास सुर्य गेला !!
Bakti is a social Force भक्तीतून सामाजिक शक्ती उभी करणारे लाखो लोकांना जिवनदृष्टि देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रर्वतक पद्मविभूषण परम पुजनीय पांडुरंग शास्त्री आठवले स्वाध्याय परिवाराचे पुजनीय दादाजी ८४ व्या वर्षी २५आॅक्टोंबर २००३ रोजी ब्रम्हनिर्वाहन लीन झाले.
ज्यांनी जगभरातील १०४ हुन अधिक देशात श्रीमद्भगवद्गीतेचे तत्वज्ञान पोहोचवले... ६० लाखाहून अधिक लोकांना आपल्या सोबत जोडले...
मच्छिमार, कोळी, आदिवासी, वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणले.. IT मधल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यापासून ते अगदी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ज्यांनी ' माणुसकी ' पोहोचवली..
रेमन मॅगसेसे, 'टेम्पल्टन' असे मानाचे पुरस्कार देऊन ज्यांच्या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली... असे थोर तत्वचिंतक... अध्यात्मिक मार्गदर्शक.. तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक आणि जगातील नामवंत अशा "स्वाध्याय परिवार" चे प्रणेते.. पद्मविभूषण... परम पूजनीय.पांडुरंगशास्त्री आठवले यांचा आज महानिर्वाण दिन त्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र.....!
!! जय योगेश्वर !! #स्वाध्याय परिवाराचे प्रर्वतक परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले महानिर्वाण दिन💐

