https://batminews.com/diwali-2025/ #news

Diwali 2025
Diwali 2025- दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हंटले जाते. संस्कृत मधील दोन शब्द पहिला "दीप" ज्याचा अर्थ होतो "दिवा" आणि दुसरा शब्द "आवली" ज्याचा अर्थ होतो "ओळ" हे दोन्ही मिळून याचा संपूर्ण अर्थ म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना अर्थात दिवाळी. ज्याला दीपावली असे देखील म्हणतात. जगाला चैतन्य देणाऱ्या प्रकाशाचा एक सण म्हणजे दिवाळी, हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. या सणाला "अज्ञानावर ज्ञानाचा, अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे" प्रतीक मानले जाते.आश्विन आणि कार्तिक महिन्यात, म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या मध्यात, दिवाळी साजरी केली जाते.