#😭भीषण भूकंपात 800 जणांचा मृत्यू🔴
अफगाणिस्तानातील भूकंपात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
या कठीण काळात भारतानं अफगाणिस्तासाठी मदतीचा पुढे केला आहे.
अफगाणिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या मदतीबाबत, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, भारतानं अफगाणिस्तानसाठी मानवतावादी मदत वाढवली आहे.
1 सप्टेंबरला, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं होतं की, त्यांनी अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे.
जयशंकर यांनी एक्स वर लिहिलंय की, "आज अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली. भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केला."