“मी वेळेशी बोललो”
आज मी वेळेशीच बोललो,
म्हणालो
“तू एवढ्या घाईत का असतोस?”
तो हसला आणि म्हणाला,
“लोक थांबत नाहीत,
म्हणून मला धावावं लागतं.”
मी म्हणालो
“प्रेम मागे पडतं तुझ्यामुळे.”
तो शांतपणे म्हणाला,
“प्रेम कधी मागे पडत नाही,
लोकच पुढे निघून जातात.”
मी गप्प झालो.
वेळ पुढे गेला.
आणि मी पहिल्यांदा
स्वतःकडे थांबून पाहिलं. #📝कविता / शायरी/ चारोळी #मराठी कविता चारोळ्या, शेर शायरी #मराठी कविता #कविता
