सर्वसामान्यांना गुड न्यूज! दिवाळीआधी RBI कडून मोठं गिफ्ट; कर्ज घेण्यासोबत EMI होणार कमी
RBI Guidelines from 1 October: नवीन महिन्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही बँकिंग नियमांमध्ये सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये 7 बदल प्रस्तावित असून त्यापैकी तीन 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सोन्याच्या कर्जाशी संबंधित इतर नियमांमध्येही अनेक बदल केले आहेत ज्यामुळे गोल्ड लोन घेणाऱ्या लहान ग्राहकांना फायदा होईल. व्याज आणि EMI देखील कमी होतील.