२६ ऑगस्टची ती काळरात्र…
२६ ऑगस्टची ती काळरात्र आजही ठाणेकरांच्या, महाराष्ट्राच्या हृदयात जिवंत आहे.
फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होतं – डॉक्टर, नर्स आणि शिशिरजी शिंदे यांची धावपळ, त्यांची काळजी, त्यांचा एकच प्रयत्न… “साहेब लवकर बरे व्हावेत, आणि पुन्हा टेंभी नाक्यावर आपल्या लोकांमध्ये यावेत.”
सगळ्यांच्या डोळ्यांत आशा होती.
संपूर्ण रुग्णालय दणाणून गेलं होतं, बाहेर हजारो कार्यकर्ते रात्रभर पहारा देत होते. प्रत्येकाचं हृदय धडधडत होतं – “आपले साहेब परत येणारच.”
पण… त्या एक ते दोन तासांत काळाने अशी उलटफेर केली की इतिहासच बदलून गेला.
अचानक एक बातमी आली…
“आपले दिघे साहेब आता नाहीत.”
क्षणभरासाठी ठाणे शहर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र थरथरला.
ज्यांच्या शब्दाने लाखोंना आधार मिळायचा, ज्यांच्या उपस्थितीने अन्यायाविरुद्ध ताकद उभी राहायची, ते धर्मवीर साहेब कायमचे निघून गेले.
आज दोन तप उलटले तरी, एकच भावना मनात येते –
“साहेब, परत या…!
ठाण्याच्या टेंभी नाक्यावर तुमचं आश्रम आजही तेवतंय,
लोकांच्या हृदयातलं सिंहासन आजही रिकामंच आहे…
परत या साहेब, परत या…!”
जय महाराष्ट्र 🚩 #शिवसेना
