⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
📜 २८ सप्टेंबर इ.स.१६३६
औरंगजेबाने उदगीर किल्ला जिंकला
१४ जुलै १६३६ रोजी बादशाह शाहजहानने शहाजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार नेमलं आणि तो उत्तरेकडे निघून गेला. पुढची दख्खन मोहीम आता औरंगजेब चालवणार होता. औरंगजेबाने औरंगाबाद ही राजधानी केली आणि निजामशहाचे - म्हणजे शहाजीराजांचे - जवळपासचे किल्ले आणि मुलूख जिंकायचा सपाटा लावला. त्याच्या सोबत मदतीला आदिलशाही सैन्य होतेच. २८ सप्टेंबर १६३६ रोजी त्याने उदगिरचा किल्ला जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/gWMstDKOBkA?feature=share
📜 २८ सप्टेंबर इ.स १६५६
( अश्विन शुद्ध प्रतिपदा, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, सोमवार )
तिमाजी खंडेरावाच्या निवाड्यास महाराजांनी पुण्यात गोतसभा भरवली :-
तिमाजी खंडेराव सुपे परगण्यातील मौजे कोल्हाळ येथील रहिवासी होता आणि कुलकर्णी देखील होता. दुष्काळात रखमाजी व अंताजी उंडे पणदरकर यांची कुलकर्ण व ज्योतिषवृत्ती २० होणास तिमाजीने विकत घेतली. ३५ वर्षांनी रखमाजी ऊंडेंचे पुत्र विसाजी व रामाजी यांनी संभाजी मामा मोहिते ह्यांना लाच देऊन तिमाजीवर अन्याय करून जबरदस्तीने कुलकर्ण वतन हिसकावून घेतले. तिमाजी कर्नाटकात थोरले महाराज शहाजीराजांकडे मदतीस गेला. शहाजीराजांनी जे पत्र दिले ते घेऊन तिमाजी शिवरायांकडे आला व गोतसभेत महाराजांनी सर्वांना बोलावून निर्णय दिला की, " ३५ वर्षांपूर्वी जर तिमाजी खंडेरायने २० होन दिले नसते तर तुमचे कुटुंब वाचले नसते, यावर बोभाटा ना करणे " आणि अश्या प्रकारे तिमाजीला न्याय मिळाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ सप्टेंबर इ.स १६८२
संभाजीराजे जेंव्हा दिलेरखानाला जाऊन मिळाले तेंव्हा त्यांच्या बरोबर त्यांची पत्नी व एक बहीण होती. संभाजीराजे मुघलांच्या तावडीतून निसटले पण त्या दोघी मागेच राहिल्या. दिलेरखानाने त्यांना कैद करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले. संभाजीराजेंनी राज्यकारभार स्विकारल्यावर त्यांना सोडवण्यासाठी आपल्या सैन्याच्या तुकड्या पाठवायला सुरुवात केली. मराठ्यांच्या या आक्रमक हल्ल्यांनी सावध होऊन औरंगजेबाने त्यांची रवानगी दौलताबादच्या किल्ल्यात केली. तरीसुद्धा मराठ्यांचे नगरच्या किल्ल्यावरील हल्ले थांबले नव्हते. त्यामुळेऔरंगजेबाने शहजादा शाहआलमचा मुलगा महंमद मुईजुद्दीन याला ८ हजार प्यादे आणि ६ हजार स्वारांची मनसब दिली व रत्नजडीत कंठा, एक घोडा व खिलतीची वस्त्रे दिली आणि त्याला अहमदनगर शहर व किल्ल्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले. या स्वारीत रणमस्तखान,दाऊदखान व गझनफरखान या सरदारांना त्याने शहजादयाच्या मदतीला दिले.औरंगजेबाच्या या तयारीवरून शंभुराजेंच्या आदेशाने अहमदनगर परिसरात मराठ्यांनी किती आक्रमक हल्ले केले होते ते लक्षात येते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ सप्टेंबर इ.स १६८७
(अश्विन शुद्ध द्वितीया, शके १६०९ प्रभव संवत्सर, वार बुधवार)
अकबराच्या बंडाबाबत लंडनचे पत्र!
लंडनहून आलेल्या एका पत्रात लोकसमाजाचे एक चांगलेच चित्र रेखाटले गेले आहे. "औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाच्या विरुद्ध शस्त्र धरले असून त्याने त्याच्या बापाची आणि आजोबांची पार वाट लावली हे इतिहासात नमूद आहे अर्थात त्यांच्या मुलाकडून त्यापेक्षा कोणती अधिक चांगली वागणूक मिळणार? बहुतेक सर्व मनुष्यांच्या पापाचे शासन ईश्वर याच जन्मात भोगावयास लावतो. त्यामुळे तुम्ही औरंगजेबाबद्दल काहीही लिहिलेत तरी आमचे मत आहे की, सध्याचा मुघल बादशहा औरंगजेब या जगात शांततेचे फारच थोडे दिवस काढील". घरगुती भांडणाबरोबर औरंगजेबाने इतरत्र चांगले संबंध राखले नव्हते. अदिलशाही, कुतुबशाहिशी वैर करून त्यांची राज्ये खालसा करण्याचा डाव, डच, फ्रेंच यांचेसोबतचे वाद, सुरतेच्या वखारीचे मुघलांनी केलेले नुकसान, त्यामुळे सुरतकर इंग्रजांचे वैर यामुळे खऱ्या अर्थाने आता एकटा पडत चालला होता. इंग्रजांच्या पत्रातून औरंगजेबाच्या स्वभावाचे पदर समोर येतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ सप्टेंबर इ.स.१७३९
शके १६६१ च्या आश्विन शु. ७ रोजी वसईच्या संग्रामांत रामचंद्र हरि पटवर्धन यांस गोळी लागल्यामुळे मृत्यु आला. पेशव्यांच्या अमदानीत जी धराणा प्रसिद्धीस आली त्यांत हरभट पटवर्धनांचे घराने प्रमुख आहे. यांचीच मुले गोविंदपंत नाना, रामचंद्रपंत व भास्करपंत ही पुण्यास येऊन बजीरावांजवळ राहून पराक्रम गाजवू लागली. पश्चिम किना-यावर पोर्तुगीजांचा धार्मिक जुल्म वाढत चालला होता. त्याला आळा घालण्याचे काम चिमाजीअप्पाने केल. मराठ्यांच्या इतिहासात राष्ट्रप्रेम, शौयें, संघशक्ति, इत्यादि उदात्त गुणांचे दर्शन घडविणारे जे काही थोडे प्रसंग आहेत त्यांत वसईच्या युद्धाची गणना प्रामुख्याने होत असते. या संग्रामातील मोहीम इ.स.१७३७ च्या मार्च-जूनमध्ये होऊन ठाणे व साष्टी काबीज झाली. या लढाईत रामचंद्र पटवर्धन प्रमुखांपैकी एक होते. आता पोर्तुगीजांच्या लढयास चांगले रूप येणार होते. बाजीरावांने रामचंद्र हरीस लिहिले, “साडेबत्तीसशे माणूस
केळवे माहिमच्या कार्यभागास तुम्हांकडे नेमिलें आहे.... फिरग्यांच्या लोकांनी वारे घेतले आहे. तुम्हांवरही तोंड टाकतील, त्यांस जपून एकवेळ कापून
यानंतर १७३८ मध्ये रामचंद्र हरि यांनी माहिमास मोर्चे लावले, आणि केळव्याकडे सातभाठी माणूस घेऊन रामचंद्रपंत चालुन गेले. रामचंद्रपंतांनी खुद्द दोघे ठार केले आणि गनिम फिरवला. ते समयी रामचंद्रपंतांचे उजव्या हातास गोळी लागली. हातची तलवार सुटून गुडघ्यास लागली ऐसे होतांच मशारनिलहे पिरले त्याबरोबर गनिमाने मोर्चे काबीज केले, आमचे लोकांचा धीर सुटोन निघाले, महादजी केशव व धोंडोपंत, वाघोजी खानविलकर, राजबाराव बुरुडकर, चितो शिवदेव, वगैरे लोक मोचीत होते त्यांस निघावयास फुरसत न होऊन तेथेच झुंजोन कामास आले. अजमासे दोनशें माणूस कामास आले व जखमी शंभरापर्यंत." या लढाईत झालेल्या जखमी मुळेच रामचंद्र हरीचें आश्विन शु. ७ रोजी निधन झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २८ सप्टेबर इ.स.१८३८
बहादूरशहाच्या आधी तख्तपोशी करून राजा झालेला धाकटा युवराज मिर्झा जहांगीर पुढे अतिमद्यपानाने मेला. त्याच्या निधनानंतर आपल्याला दिल्लीची गादी मिळेल असे बहादूरशहाला वाटत होते. २८ सप्टेबर १८३८ ला जफरला दिल्लीचे तख्त मिळाले देखील ; पण ते राज्य, ती राजवस्त्रे अंगावर जेंव्हा चढली तेंव्हा त्याच्या सत्तेवर अप्रत्यक्षपणे इंग्रजाचाच अंमल होता. धूर्त इंग्रजांनी त्याला बजावले होते की, "तू आता राजा आहेस, पण लक्षात ठेव फक्त आणि फक्त नामधारी राजा !" ज्या मुघल सत्तेच्या सीमा एके काळी चारीदिशांना हजारो किलोमीटर अंतरापर्यंत विस्तारल्या होत्या त्या मुघलांच्या अखरेच्या शिलेदाराची सत्तासीमा फक्त लाल किल्ल्य़ाच्या वेशीपर्यंतच राहणार होती. ज्या लाल किल्ल्यात दिवाने खासची शान मुघल बादशहाच्या आगमनाने वाढत होती, तिथे बादशहाच केविलवाणा झाला होता. ज्याच्या मागेपुढे अहोरात्र चवऱ्या ढाळल्या जायच्या त्याच्या मागे आता फक्त त्याची दीनवाणी सावली उरली होती. काळीज विदीर्ण करणारा ही अट बहादूरशहाने डोळ्यात पाणी आणून कबूल केली, कारण त्याच्यापुढे कुठलाही पर्याय बाकी नव्हता....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
