रंगांच्या मोहात अडकलेली ती…
तिला कधी जाणवलंच नाही,
की तिच्या जीवनाचे खरे रंग तर
हिंदू कोड बिलात सामावले आहेत—
पहिला — शिक्षणाचा दीपस्तंभ,
दुसरा — वारसाहक्क व संपत्तीची ओळख,
तिसरा — सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्याचा श्वास,
चौथा — मतदानाचा सामर्थ्यदायी हक्क,
पाचवा — समान वेतनाची समानता,
सहावा — लैंगिक व शारीरिक सुरक्षिततेचे कवच,
सातवा — मातृत्व रजेचा सन्मान,
आठवा — गर्भधारणेवरील स्वायत्ततेचा हक्क,
नववा — रोजगारातील समान संधीचे आकाश.
बघ ग, बये…
एकदा तरी डोळे उघडून—
हे नऊ रंग
तुझ्या अस्तित्वाचे!
तू नेसलेल्या साड्यांच्या रंगांपेक्षा
कितीतरी गडद,
कितीतरी मौल्यवान.
त्यांना ओळख,
त्यांचा सन्मान कर,
आणि बघ—
तुझं आयुष्य कसं उजळून निघेल…
लखलखत. ✨ #कविता
