⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳
📜 २४ सप्टेंबर इ.स.१६५६
(अश्विन वद्य १ शके १५७८ प्रतिपदा वार बुधवार)
सुपे परगणा स्वराज्यात दाखल!
महाराजांनी मोहीते मामांना पत्र पाठवले की, "पागा घेऊन पुणे मुक्कामी येणे" पण मोहीते मामांनी महाराजांचे पत्र आणणार्या जासुदासमोर उर्मट जाबसाल करताना म्हटले की "शहाजीराजे समक्ष असता हे मालक नाहीत. हुकूम करितात आणि राज्यात पुंडावे करून ठाणी बसवितात हे राजांच्या प्रतिष्ठेवरी निभावले होते. याउपरी फैल (=पुंडावा) केला तरी राजांची शोभा राहणार नाही आणि हेही प्राणेकरून वाचणार नाहीत. काही आपले पायाकडे पाहून करावे. म्हणजे मामांनी भाच्यालाच "प्रौढ" उपदेश केला. आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्या मामांनी पत्राचा जबाब पेश केला नाही की ते स्वतःही महाराजांच्या भेटीस गेले नाहीत. महाराजांच्या सूचनेकडे त्यांनी सरळसरळ दुर्लक्ष केले. संभाजी मामा हे जसे शहाजीराजेंचे शालक व महाराजांचे मामा होते तसेच ते शहाजीराजेंचे व्याहीही होते. म्हणजे मामाची मुलगी अन्नुबाई ही शहाजीराजेंचे पुत्र व्यंकोजीराजे यांना दिली होती. बहुधा या नाते संबंधांमुळे महाराज आपणास हात लावणार नाहीत असा मोहीते मामांचा अंदाज असावा. पण मामा बऱ्या बोलाने वळत नाहीत हे लक्षात येताच महाराजांनी इ.स.१६५६ च्या अश्विनात दसरा उलटल्यावर अकस्मात सुप्यावर हल्ला चढविला. गढीत फारसे बळ नव्हतेच. सुपे लगेच महाराजांच्या ताब्यात आले. महाराजांनी क्षणार्धात मोहीतेमामांना कैद केले. गढीत बरेच द्रव्य कापडचोपड, वस्तू व पागेत ३०० घोडे होते. हे सर्व महाराजांनी जप्त केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link🔗
https://youtube.com/shorts/XSUNBCNI2Zc?feature=share
📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७१
छत्रपती शिवाजीराजांची अंतर्गत व्यापारावर करडी नजर
१६७१ साली कोकणातील दाभोळ इथे नारळ स्वस्तात विकले जात होते. ज्यामुळे आसपासच्या परिसरात नारळाच्या व्यापारावर परिणाम होत होता. शिवाजी राजांच्या हे लक्षात येताच त्यांनी मामले प्रभावळीचे सुभेदार तुकोराम यांना नारळाच्या विक्रीबाबत दक्षता घ्यावी ह्याबद्दल हे पत्र लिहिले आहे. शिवाजी राजांचा आत्मविश्वास आणि व्यापार नीती पत्रात स्पष्ट दिसून येते. मशहुरल हजरत मायन्याचे २४ सप्टेंबर १६७१ रोजी लिहिलेले हे पत्र शिवाजी राजांच्या राज्याभिषेक पूर्वीच्या पत्रात दिसणाऱ्या जुन्या मायन्यांपैकीचे एक आहे. शिवशाहीच्या त्रिशुळाने जिंकलेला कोकणच्या प्रदेशात स्थिर झाल्यानंतर, मराठ्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला असावा. त्याचा परिणाम अश्या पत्रांतून रूंदावणाऱ्या व्यापारी हेतूतून आणि एक केंद्रशासित सत्ता आणि व्यवस्थापन व्हावे ह्या नीतीतून दिसतो. स्वराज्य चौफेर वाढत असताना देखील केंद्रशासित रहावे तेव्हा कुडाळच्या नरहरी आनंदराव सुभेदाराला देखील डिसेंबर १६७१ मध्ये असाच एक जबर जकातीचा हुकुम महाराजांनी पोर्तुगीज मीठावर लावावा असे लिहिलेले दिसून येते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २४ सप्टेंबर इ.स.१६७४
( अश्विन शुद्ध पंचमी, शके १५९६, संवत्सर आनंद, गुरुवार )
शिवरायांचा दुसरा राजाभिषेक :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का करून घेतला? तो कोणी व कसा केला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल का?
स्वराज्य चे स्वप्न २ पिढ्यांनी पाहिले होते. फर्जंद महाराजा शहाजीराजेंनी अथक प्रयत्न करून केलेल्या पायाभरणी वर त्यांच्या पुत्र शिवरायांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करत सुवर्ण कळस चढविले आणि ह्या मायभूमीचे पांग फेडले. ई. स. १६७४ साली रायगडावर अवघ्या इतिहासाच्या साक्षीने वैदिक पद्धतीने राज्याभिषेक सोहळा पार पडला. अखेर मराठी मातीला गादी मिळाली. हिंदूंचे तख्त निर्माण झाले. ह्या म्लेंच्छ बादशाही मध्ये एक मऱ्हाटा एवढा पातशहा झाला. ६ जून, १६७४ साली झालेला राज्याभिषेक सोहळा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. परंतु, त्याच्या २-३ महिन्यांच्या नंतर सप्टेंबर महिन्यात शिवरायांनी अजुन एक* *राज्याभिषेक करुवून घेतला , तो म्हणजे तांत्रिक राज्याभिषेक. ह्या राज्याभिषेकाबद्दल ची माहिती आपल्याला गोविंद नारायण बर्वे लिखित " शिवराज राज्याभिषेक कल्पतरू " नावाच्या ग्रंथामध्ये मिळते. मूळ ग्रंथ हा ई. स. १६९९ मध्ये लिहलेला असून तो संस्कृत भाषेत होते. आज ही पोथी Indian Asiatic Society, Calcutta मध्ये ठेवण्यात आली आहे.
तांत्रिक राज्याभिषेकाच्या पौरोहित्य हे निश्चल पुरी गोसावी ह्यांनी केले. ते गोसावी पंथाचे असून यजुर्वेदाचे निष्णात अभ्यासक होते. ते मूळचे वाराणशीचे होते. निश्चल पुरींनी हा तांत्रिक राज्याभिषेक " आनंद नाम संवत्सर अश्विन शुद्ध पंचमी " ह्या तिथीला (म्हणजेच २४ सप्टेंबर, १६७४) प्रातःकाळी उठून कलश स्थापन करून राज्याभिषेक विधी सुरू केला.
उपलब्ध पोथी मध्ये एकूण ८ शाखा (भाग) आहेत. ह्यातील पहिल्या ४ प्रकरणात निश्चल पुरी आणि गोविंद बर्वे ची झालेली भेट आणि वैदिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. ५ व्या प्रकरणात निश्चल पुरी नी केलेल्या तीर्थ यात्रेचे वर्णन तसेच महाराजांनी निश्चल पुरीस केलेली विनंती, असा गोषवारा आहे. ६ व्या आणि ७ व्या प्रकरणात तांत्रिक राज्याभिषेकाचे वर्णन आहे. तसेच ८ व्या प्रकरणात राज्याभिषेकाचा महाराजांवर झालेल्या परिणामाचे वर्णन केलेले आहे.
हा विधी फक्त एका दिवसाचा होता. निश्चल पुरींनी प्रातःकाळी उठुन कलश स्थापना केली. त्यानंतर सर्व पूजा विधी तंत्रानुसार केली. नाना रंगानी आकर्षक बनवलेले मेरुयंत्र यंत्र उचलून घेतले. ललित पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छतानी आणि खांबानी सुशोभित झाले होते. मंडपानी अलंक्रुत झालेले होते.
त्यानंतर सिहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशांची पुजा करुन भुमी विधीपुर्वक शुद्ध केली. ती पंचरत्नानी पुर्ण केली.
त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले. आसनाच्या पूर्व दिशेस हर्यक्ष नावाच्या सिंहास पशुचा बळी दिला. दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरविणारा स्थापन केला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाचा बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापन केला व बळी आर्पण केला. पश्चिम बाजुस मृगेंद्र स्थापन करून बळी दिला. वायव्येला शार्दुल स्थापित करुन त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापन करून त्यास पशुचा बळी दिला. शंकराच्या दिशेला बळीचे रक्षण करणारा हरी नियुक्त केला. अशाप्रकारे आठ जणाच्या पाठीवर आसन स्थिर केले.
निश्चल पूरीनी रत्नमय वेदीवर रुप्याचे मोठे आसन स्थापित केले आणी अभिषेकासाठी महाराजांना त्यावर बसवले. तेथे आठ दिशेला आठ कलश स्थापन केले आणि त्याची रत्नानी पूजा केली.
त्यानंतर त्यांनी महाराजांना आसनावर बसविले. स्वजनाना दुर पाठवुन सर्व आवयवाना शुभप्रद अशा महामंत्रानी वेष्टन घातले. त्यावेळी राजसभेत नगारा वगैरेवाद्ये वाजविली जात होती. वेदपारंगत ब्राह्मण साममंत्र गात होते.
त्यानंतर महाराजांनी नवीन वस्त्रे परिधान केले व अन्नाच्या पर्वतास नैवेद्य दाखवला.त्यामुळे रायरी पर्वत संतुष्ट झाला.त्यानंतर निश्चलने महाराजाना विद्येचा उपदेश केला.
त्यानंतर महाराजानी घरात प्रवेशकेला व भोजन करुन राजसभेकडे आले. या विधीत दहा महामंत्र,राजराजेश्वरी विद्या, ब्रह्मस्त्र महाविद्या व ६४ तंत्र विद्या महाराजाना दिल्या, असे ह्या पोथी मध्ये लिहला आहे.
निश्चलपुरी गोसावी नी दुसरा राज्याभिषेक केला.तमाम इतिहासकारांनी संभाजी महाराजांना शाक्त पंथ चे पूजक असल्याचे आरोप केले अन निश्चलपुरी गोसावी हे पण शाक्त पंथांचे होते .
शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा वेदिक पद्धतीने गागाभट्ट यांनी केला. गागाभट्ट ने त्यानुसार शिवाजी महाराजांनी गागाभट्ट यांच्या शी चर्चा करून राज्यभिषेक रायगड वर करण्याचा निर्णय घेतला.
१४ व्या आणि १५ स्या शतकात पैठण हे विद्वानांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते.तिथेच भट्ट आणि शेष नावाचे दोन घर प्रसिद्ध होते.भट्ट यांच्याच घरातील गोविंद भट्ट हा पैठणहून काशीस गेले आणि त्यांच्या च घरात हे गागाभट्ट जन्माला आले होते.
अकबर च्या कारकिर्दीत शेष नावाचे यांनी शुद्रचार्शिरोमनी ग्रंथ लिहिला आणि त्यात लीहाले की क्षत्रिय या जगात संपले याचाच समाचार गागाभट्ट यांनी कर्यास्याधर्मपदिप नावाचं एक ग्रंथ लिहिला आहे.त्यात त्यांनी शुद्रचार्शिरोमनी नावाच्या ग्रंथाचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात काही शतके असा राज्यभिषेक झाला नव्हता आणि खिलजी च्या आक्रमण नंतर अशी विद्वान लोक शिल्लक नव्हती.त्यामुळे या शेष घराण्याचे मत शिवाजी महाराजांना मानावल नाही बाळाजीआवाजी, केशावभट्ट , भालचंद्र भट्ट यांनी राजस्थानला जाऊन सर्व महाराजांच्या कुळाची माहिती घेतली. रीतीने ६ जून १६७४ ला पहिला राज्यभिषक झाला.
याच राज्यभिषेक ल निश्चलपुरी गोसावी आमंत्रित म्हणून उपस्थित होते. राज्यभिषेक नंतर ते कोकणात सर्व क्षेत्री फिरले तिथे त्यांनी गोविंद या ब्राम्हण विद्वान ना भेटले आणि राज्यभिषेक ची माहिती दिली. त्यात त्यांनी घटना सांगितल्या शिवाय पहिला राज्यभिषेक झाल्यावर निश्चलपुरी नी शिवाजी महाराज ना जाताना सांगितले की राजा १३ व्य, २२ व्यां ,५५ व्यं आणि ६५ दिवशी खेद जनक गोष्टी घडतील. १३ व दिवशी जिजाबाई आऊसाहेबांचे निधन झाले.रायगडवर हत्ती मरण पावला.
१) राज्यभिषेक अगोदर राजांची पत्नी काशीबाई यांचे निधन झाले
२) राज्यभिषेक आधी सेनापती गुर्जर यांचे पण निधन झाले
३) राज्यभिषेक का वेळी गायोच्युदेश च्यां आदल्या रात्री उल्कापात झाला.
४) राज्यभिषेक च्याच वेळी शिवाजी महाराजांनी पुनः आपल्या पत्नीशी विवाह केला जे अपशकुनी होते असे निश्चलपुरी चे म्हणणे होते
५) सुवर्णतुला वेळीस एक लाकूड पडले आणि गागाभट्ट च्या नाकास लागले
६) गागाभट्ट ने त्याच्या ब्राम्हणांना आहेत दिला याच राग पण निश्चलपुरी ने बोलून दाखविला
७) राज्यभिषेक वेळी बळभट्टाच्या अंगावर लाकडी फुले पडले
८) निश्चलपुरी मात्र राज्याभिषेक हा कुमुहूर्तावर होता
९) स्थानिक देवांचे पूजन आणि बलिदान न दिल्यामुळे निश्चलपुरी बोलले की राज्यभिषेक अपशकुनी झाला आहे.रायगडवर शिकाई देवीची पूजा केली नाही.कोकण रक्षक भार्गव ची पूजा केली नाही.हनुमान आणि वेताळ ल पुजले नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २४ सप्टेंबर इ.स १६८४
(भाद्रपद वद्य १०, दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर वार बुधवार)
फितुरी सुरुच!
राअंदाजखानाच्या कौलनाम्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचा नोकर भद्रोजी हा चाकरीच्या आशेने आला. त्यास मनसब येईपर्यंत रोजीना दिला जावा असा हुकूम खंडोजी हासुद्धा काझी हैदर याच्या मध्यस्थी मार्फत मुगलांकडे आले त्यांना मनसदी व त्यांचा उत्कर्ष करण्याचा हुकूम देण्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ सप्टेंबर इ.स.१६९०
छत्रपती संभाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्यातील अनेक वतनदार मुघलांच्या सेवेत जायला सुरुवात झाली होती. याला प्रमुख कारण होते वतनदारांची वतनाप्रती असलेली आसक्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचा वतनदारीला विरोध होता. त्यांनी वतने सरकारजमा केली होती व त्यांच्या सेवेबद्दल रोख रक्कम म्हणजे वेतन द्यायला सुरुवात केली होती. पण संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बदललेल्या परिस्थितीत छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय बदलावा लागला. वतनदार मंडळी स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी महाराजाना देशमुख, देशकुलकर्णी,मोकदम व इतरांची वतने परत करावी लागली. छत्रपती राजाराम महाराजाना हा निर्णय कोणत्या परिस्थितीत घ्यावा लागला ते आपल्याला मुठेखोरेच्या हवालदार व कारकून यांना मावळ प्रांताचे सुभेदार महादजी शामराज यांनी पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २४ सप्टेंबर इ.स.१७०९
"राजा शाहू मोठी फौज घेऊन चंदनगडातून बाहेर पडला ,त्याने मराठे सरदारास आज्ञा केली, बादशाहने सरदेशमुखी वतन आम्हास बहाल केले आहे, तुम्ही उत्तर प्रांतातून त्याचा वसूल आणा , चौथाईचा वसूल यावयाचा तो आला नसेल तर बादशाही "खजिने लुटून " भरपाई करून घ्या ." हे आदेश मोगलांनी नोंदविलेले आहेत व ते उत्तरेशी संबंधित आहेत.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 २४ सप्टेंबर इ.स.१७२४
पेशवे बाजीराव यांची निजामाशी दिनांक १८ मे सन १७२४ रोजी नालछा येथे भेट झाली. मुबारिजखान याच्या विरोधात निजामास मदत करण्याचे पेशवा बाजीराव यांनी आश्वासन दिले. चारच महिन्यांनी म्हणजे सन १७२४ च्या सप्टेंबर महिन्यात पेशवा बाजीराव यांनी पातशाही सुभेदार मुबारिजखान याचा सपशेल पराभव केला. हा पराक्रम पाहून निजामाने पेशवा बाजीराव यांना "शहामतपनाह" हा किताब दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ सप्टेंबर इ.स.१८६१
मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म
या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. १९०७ मधे जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला. त्याच वेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून ’वंदे मातरम’ हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९३६)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २४ सप्टेंबर इ.स.१८७३
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -
“विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
