#🙏शिवदिनविशेष📜 .*🚩आजचे _ऐतिहासिक _शिव~शंभू दिनविशेष🚩*
*११ ऑक्टोबर इ.स.१६७३*
*खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक छत्रपती शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी.*
*११ आॅक्टोबर इ.स.१६७३*
*छत्रपती शिवरायांनी "बंकापूर" वर चढाई केली.*
*११ आॅक्टोबर इ.स.१७०७*
*खेडच्या लढाईत "छत्रपती शाहू (थोरले)" यांच्याकडून करवीरच्या "महाराणी ताराबाई" पराभूत.*
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!
#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

00:15