#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
{{291805857}} {{2602645515}}
राज ठाकरेंचं भाकित आणि भिवंडीतील अटक.
भिवंडीमध्ये नुकत्याच झालेल्या टेरर फंडिंग प्रकरणातील अटक आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी केलेल्या विधानाची आठवण अनेकांना झाली आहे.
राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या भाषणात सांगितलं होतं की, जर पोलिसांना भिवंडी आणि बेहरामपाड्यासारख्या विशिष्ट भागांमध्ये ४८ तास मोकळं रान दिलं तर महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल. भिवंडीमध्ये दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवणाऱ्या तीन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली. या घटनेमुळे राज ठाकरेंच्या या विधानाला पुष्टी मिळाल्याचं बोललं जात आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणांमधून अनेकदा भविष्यातील घटनांचा अंदाज येतो, त्यांच्या इशाऱ्यांकडे केवळ राजकीय विधान म्हणून न पाहता, त्यामागे दुरदृष्टी असते असं मानलं जातं. भिवंडी प्रकरणात अटक झालेल्या आरोपींमुळे राज ठाकरे यांच्या विधानातील गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे.
या घटनेनंतर, आतातरी सरकारने देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य आणि कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#RajThackeray #AmitThackeray #MNS #mnsadhikrut #Mnsreport9 #mnsrepost #mnsmanmad99
#मनसे #महाराष्ट्रसैनिक #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज
Raj Thackeray Amit Thackeray MNS Adhikrut Repost Raj Thackeray MNS Report Avinash Jadhav MNS MNS Social - मनसे सोशल
