ShareChat
click to see wallet page
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवरील भीषण दहशतवादी हल्ल्यात देशाच्या सुरक्षेसाठी शौर्याने लढत वीरमरण प्राप्त करणारे पोलीस उपनिरीक्षक शहीद स्व. प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या शौर्याची आज पुन्हा एकदा आठवण झाली. त्यांच्या कन्या अनुष्का प्रकाश मोरे यांना आज राज्य रोजगार मेळाव्यात अनुकंपा तत्वावर ‘औषध निर्माता’ गट ब या पदाचे नियुक्तीपत्र प्रदान केले. औषध निर्माता हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने, नियुक्तीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संवेदनशील भूमिकेमुळे ‘विशेष बाब’ म्हणून अनुष्का मोरे यांची नियुक्ती शक्य झाली. शहीद वडिलांचे स्वप्न साकार करत आज अनुष्का मोरे यांनी आपल्या धैर्य, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर नव्या प्रवासाची सुरुवात केली — ही केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. #महाराष्ट्र #मुंबई #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग राज्य रोजगार मेळावा यस्तरीय ঞ্জানং [ नेयू me 11 111] 1] महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग राज्य रोजगार मेळावा यस्तरीय ঞ্জানং [ नेयू me 11 111] 1] - ShareChat

More like this