https://batminews.com/pak-afgan-war/ #news

Pak Afgan War
काबूल / इस्लामाबाद | 17 ऑक्टोबर: पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील (Pak Afgan War) पक्टिका प्रांतातील निवासी भागांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 10 अफगाण नागरिकांचा मृत्यू, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती अफगाण प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये तीन तरुण क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. या हल्ल्याने 48 तासांचा लागू केलेला युद्धविराम पूर्णपणे मोडीत निघाला आहे.अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) या अमानवी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून, पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी त्रिराष्ट्र टी-20 मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने मात्र हे हल्ले "दहशतवादी ठिकाणांवर केले" असल्याचा दावा केला आहे.