असेच शेतीत सुरू राहीले तर उद्या......
‘भारता’ कडे बघत ‘इंडिया’ कळवळून म्हणाला -
तुला सारे शेअर्स देतो, एक कप दूध दे
तुला कंपन्यांचे बॉन्ड देतो ,एक भाजीची जुडी दे
क्रेडिट कार्डचा गठ्ठा देतो ,फक्त कोबीचा गड्डा दे
प्लॉट नावावर करून देतो ,फक्त एक भाकर दे
------------------------------------------------
तेव्हा वैतागून शेतकरी म्हणाला..
शेअरच्या ‘बुल’ची करा शेती
‘बॉन्ड’ची भाजी करून खा
‘सेन्सेक्स’ची आज करा उसळ
क्रेडिट कार्ड पिळून काढा दूध..
सोने खाणारा मिडास राजा
आज इंडियात भेटतो आहे
शेतीच्या बांधा बांधावर,भुकेचा अंगार पेटतो आहे ..
#🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #😍मान्सून फॅशन टिप्स😍 #🌹पावसाळी फुले🌹 #☔मान्सून ब्युटी टिप्स💄 #🏛️राजकारण

00:15