*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
🧘🏻♂️ *"विचार मंथन"* 🙏🏻
🌹न आयुष्यातला संघर्ष कमी होत न तक्रारी, जे हळूहळू संपतय, कमी होत जातय ते आहे "आयुष्य"..
🌹कोण काय करतोय, कसा करतोय, का करतोय या सर्व प्रश्नांपासून आपण जितके दूर राहू तितके अधिक आनंदात राहू.
🌹विचार केला होता कांही एक
केले काही वेगळच,
झाले काहीं वेगळेच
मिळाले ही काही वेगळेच
हेच तर जीवन आहे..
🌹फार कठीण आहे जीवन..
खोट बोलावे तर स्वतःला त्रास आणि खरे सांगावे तर सर्वांनाच त्रास..😊
🌹अनुभवांचे स्वागत करावे, तर काय सांगावे, कुठला अनुभव आयुष्य बदलून टाकू शकेल ते.!
🌹आयुष्यात मिळते तर बरच काही, पण आपण मोजदाद करतो जे आपल्याला मिळालेच नाही त्याची..
🌹चिकूचे बी फळात राहूनही, फळ परीपक्व झाले की, त्यातून अलगद बाहेर पडते, अगदी स्वच्छपणे..
🥭आंब्याची कोय मात्र, आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते, फळ पिकले तरी, रसातून अलग होत नाही. 'परिणाम', तिलाही लोक पूर्ण चोखल्याशिवाय फेकत नाही म्हणून..
🌹चिकूच्या बी सारखे वागावे, सगळ्या मोहजाळात राहूनही, योग्य वेळी करकरीत बाहेर पडावे..
🌹कोयीसारखे मायारूपी रसात गुरफटून रहाल, तर लोक मात्र पिळून फेकल्याशिवाय राहणार नाहीत, पिळायच्या आधीच बाहेर पडले पाहिजे..
🌹अपेक्षा कमी ठेवाव्यात, अमर्याद आनंद मिळेल बघा,
आयुष्य आहे, ते सोपे कसे असेल..
*"अन जे सोपे आहे, त्याला आयुष्य कसे म्हणता येईल..?✍🏻*
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞 जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ रात्री📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ#महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी # मी महानुभाव पंथ # श्री पंचकृष्ण# श्री आत्रेय नमः #माझा देव पोईराज बाबा. #शुभ रात्री
![महानूभाव पंथ - CET;TITEr जयश्री कृष्णाजी 7rores] दंडवत प्रणाम Jo Shi Kishno SUKo Jodhow पीगण%णप CET;TITEr जयश्री कृष्णाजी 7rores] दंडवत प्रणाम Jo Shi Kishno SUKo Jodhow पीगण%णप - ShareChat महानूभाव पंथ - CET;TITEr जयश्री कृष्णाजी 7rores] दंडवत प्रणाम Jo Shi Kishno SUKo Jodhow पीगण%णप CET;TITEr जयश्री कृष्णाजी 7rores] दंडवत प्रणाम Jo Shi Kishno SUKo Jodhow पीगण%णप - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_267313_20667b60_1761848263128_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=128_sc.jpg)
