#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५४ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे उमाजीराजे संभाजीराजे भोसले यांचा जन्म शहाजीराजे आणि मातोश्री जिजाऊ याचे थोरलेसंभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र, उमाजी हे थोरल्या संभाजीराजांचे पुत्र. शहाजीराजे इ.स. १६६४ मध्ये वारले तेंव्हा हा उमाजी दहा वर्षांचे होते. उमाजीस विजापूरकरांतर्फे जहागीर होती. ऐन तिशीच्या सुमारास हे आपल्या तलवारीच्या बळावर पराक्रम गाजवत असल्याचा पुरावा इ.स.१६८३ च्या एका महजरावरून मिळतो. उमाजींना बहादूरजी नावाचा एक पुत्र होता. त्यांचादेखील एक हुकूम उपलब्ध आहे. मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजी संभजी यांचे फर्जंदौमाजी याचे बहादूरजी.....’ सरचा हुकूम १२ डिसेंबर १६८९ चा आहे. उमाजी शिवाय थोरल्या संभाजीराजांना सुरतसिंग आणि मातोजी असे आणखी दोन पुत्र असल्याचे पुरावे कानडी साधनात मिळतात. 📜 २५ नोव्हेंबर इ.स.१६५९ अफझलखान वधाची बातमी विजापूरास समजताच साऱ्या शहरात खळबळ, गोंधळ आणि रडारड सुरू झाली. दुःखात शहर बुडाले. अली आदिलशहाने नौबत बंद केली. अफझलखानाबरोबर असलेले फाझलखान, मुसेखान, अंकुशखान वगैरे मंडळी विजापुरा येऊन पोहोचली. अफझलखानाचा मुलगा फाझलखान यास सर्वात जास्त दुःख झाले. तो मोठ्या दुःखाने खाली मान घालून विजापूरच्या सुलतानास भेटावयास गेला. त्यानंतर तीन दिवसांनी विजापुरात बातमी पसरली की शिवाजीराजे फौजेसह कोल्हापूरकडे दौड#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:29
