ShareChat
click to see wallet page
सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दान! पुण्यातील भाजी विक्रेते चरण वणवे यांनी आज 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी तब्बल ₹1,13,724 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी आमदार हेमंत रासने उपस्थित होते. संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी चरण वणवे आपल्या घरातील सद्गुरू शंकर महाराज यांच्या पादुकांपुढील पेटीत दररोज ₹100 जमा करतात. कोविड काळातही त्यांनी याच संकल्प पेटीतून मोठी मदत केली होती. सोलापूरसह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर मोठं संकट आले आहे. अशा वेळी मदतीचा हात पुढे करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. याच भावनेतून चरण वणवे यांनी दाखवलेलं माणुसकीचं उदाहरण प्रेरणादायी आहे. #महाराष्ट्र #पुणे #देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र - WLIHROUO DETEGIOI a WLIHROUO DETEGIOI a - ShareChat

More like this