#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 च्या भाजीचा पराठा ___ फोंडशीची भाजी, एक वाटी गव्हाचे पीठ , अर्धी वाटी भाजणीचे पीठ हळद मीठ तेल, अर्ध्या लिंबाचा रस, दोन लाल सुक्या मिरच्या , अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस, थोडी फोंडशी ची मुळ , एक चमचा चिंचेचा कोळ, पांच सहा पाकळ्या ठेचलेला लसूण एक चमचा लाल तिखट आणि कढीपत्ता . कृती ___ फोंडशीची भाजी धुऊन बारीक चिरून घ्यावी एका बाऊल मध्ये भाजी गव्हाचे पीठ भाजणीचे पीठ लाल तिखट मीठ लिंबाचा रस घालून पाण्याचा शिबका मारून पीठ मळून घ्या ( जास्त पाणी घालू नका कारण फोंडशीच्या भाजीला पाणी सुटतेच ) आता पीठ मळून झाल्यावर त्याचे पराठे करा तव्यावर तेल घालून हे पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या . चटणी ___ खोबऱ्याचा कीस, लसूण थोडे जिरे दोन सुक्या मिरच्या, मीठ आणि फोंडशीची मूळ चिंचेचा कोळ हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्या या चटणीला कढीपत्त्याची फोडणी द्या आणि गरमा गरम पराठ्या सोबत सर्व्ह करा.
