छोट्या छोट्या गोष्टी वरुन खूप मोठ भांडण होऊ शकत...
किती चांगल नातं असेल एका कारणामुळे आपलं घर तुटत....
आपण आपल्या सासू -सासरे ना आई- वडील समजल तर आपला संसार सुखाचा होईल ...🙏
✍️✍️✍️
*लग्न*
नवीन नवीन छान राहायचे काही दिवसांनी...
लग्न झालं नवीन नवीन खूप छान राहायचे..
दिवाळी आली, बायकोला पाच हजार रुपये दिले साडी घेण्यासाठी , आई वडिलांना पण दिले पैसे, बायकोला खूप राग आला कशाला तुझ्या आई वडिलाला का पैसे दिले, मला देईच ना ,
राहुदे त्यांना खर्चाया लागतो, माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहे मी
आज आहे मी माझ्या आई वडीलच्या कष्टामुळे..
मला शिकून मोठ केलं हे सगळ पैसा 💸💰 आई- वडील कमवून ठेवलेलं आहे.. मी तर एक वर्ष झाल कामाला जात आहे,
बायको मग लग्न कशाला केलं मग तुमच्या आई -वडिलांना सांभाळायची ना...अग तु माझी अर्धांगिनी आहेस मी जेवढं पैसा कमावतो, माझ्या,
आई -वडीलाचां पण तेवढाच अधिकार आहे, तुझ पण तेवढाच अधिकार आहे,
माझ्या आई- वडिलांमुळे मी आहे, मी आई वडिलांना कधी विसरू शकत नाही.
बायको -:मग मला सोडता का आई वडीलांसाठी...?
नवरा : नाही ग ,तुला कस सोडणार? माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर...
नवरा जास्त बोलत नाही तो कामाला जातो,....
बायको :संध्याकाळी थोडा वेळ झोपली असते, मग सासूबाई,म्हणतात सुनबाई उठ ग, संध्याकाळ झाली आहे देवी *लक्ष्मी* येते असते असे झोपू नये.....
रोज झोपत होती, सगळ स्वयंपाक सासूबाईच करत होती......
मुद्दाम स्वयंपाकाचे वेळी झोपली...
नवरा येतो कामावरून बायकोला उठवतो काय झालं ग ?अस झोपलीस काय ?दुखतंय का सांग? लगेच जाऊ आपण दवाखाण्यात.. बायको काहीच बोलत नाही...
सासुबाईचा स्वयंपाक होतो सगळ्यांना आवाज देत असते चला जेवण करायला.... सगळे येतात, बायको जेवण म्हटल्यावर पटकन उठते,
सगळ्यांच जेवण होत, पुरुष मंडळी बाहेर अंगणात जातात....
, बायको जेवणाच ताट पण उचलत नाही,
लगेच आपल्या रुममध्ये जाते.. सासूबाईनी सगळं आवरून घेतलं....
सासूबाई घरातील सगळं कामे करायची...
मुलगा हे सगळं रोज पाहत होता, मुलगा आपल्या आईला रोज थोडी फार मदत करायचा...... आई तु किती काम करत असते?
तुझ्या सूनेला ओरडून सांग जरा, नको बाळा ,ती पण माझ्या मुली सारखीच...
परक्या घरातून आली आहे... आपण सांभाळून घ्यावे लागते..
मी केला म्हणजे मी मरत नाही मी माझ्या कुटुंबासाठीच करत असते..
सुमनबाई ला काही बोलू नकोस.......माझी लेक आहे ...😊
तो रागाने जातो आपल्या रूममध्ये ,बायकोला जाऊन बोलतो घरच तु काम करत जा माझी आई सगळ काम करत असते,
बायको :तुम्हाला तुमच्या आईन कान भरल वाटते...
नवरा: मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहे..
माझ्या आई ने खूप काम केलेले आहे...
तु थोड काम केले तर आई ला तेवढेच आराम मिळेल....
हो मी करते माझ एक अट आहे?
तुमचा सगळ पगार माझ्या हातात द्यायची......
तुला पण देतो ना खर्चाया...........
बायको मग दे मला आता दहा हजार रुपये साडी घेण्यासाठी....
नवरा, माझ्याकडे एवड पैसे नाहीत तिन हजार रुपये आहे दोन हजार घे आता एक हजार मला लागतात,
दहा हजार दिवाळी बोनस भेटलेवर देतो......
बायको ला वाटत सासू सासरे यांच्यावरच सगळा पैसा 💸💰 खर्च करतो हा..
बायकोला खूपच राग येतो, म्हातारे मुळं माझं संसार होणार नाही..
बायको आपल्या आई ला फोन केला तुझा जावय मला साडी साठी खूप कमी पैसे दिले आहे, मला खूप त्रास देतात सगळे मला नको राहायचं
रडत बोलत असते, लगेच आईला वाटत आपली मुलगी खरं बोलत आहे.
आई, विचार न करता बोलत असते, जावयाच लायकी नाही पैसै देईची,
आई आपल्या लेकीच ऐकून खूप काही बोलत होती जावय बिच्चारा किती समजुन सांगत होता, सासू एक शब्द ऐकला तयार नव्हती..
बायको आपली छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं करत होती..
नवऱ्यासोबत, भांडण करून आईला सांगायचे आई मला खूप त्रास देतात,सासू सासरे नवरा, आई समजून सांगण्याचा सोडून आपल्या मुलीच साथ देत असते , तु य सरळ माहेरी आपण बघू पुढे काय करायचे....
आईच ऐकुन मुलगी जाणार माहेरी....
नवऱ्याला वाटल काही दिवसांनी येईल परत, पण बायको दोन महिने माहेरीच होती, एक दिवस नवरा गेला बायको ला आणायला,
जावय बिच्चारा अंगणात उभा होता, सासूबाई बाहेर आली कशाला आलात
काय काम आहे, माझ्या बायकोला पाठवा सासुबाई मी घेऊन जायला आलो,
सासूबाई नाही पाठवणार निघून जावा इथून माझी लेक मला जड नाही
आम्ही सांभळ करू, जावय बोलतो ठीक आहे तुमच्या मुलीला शेवटच बोलतो तिला बाहेर पाठवा, बायको आली बाहेर, नवरा बोलतो तु येणार आहेस की नाही शेवटचं सांग, बायको, बोलते मी येणार पण माझी एक अट आहे, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सोडून माझ्या माहेरी राहावे, आणि सगळा पगार माझ्या हातात, तरच तुमच्या सोबत राहायला तयार आहे, नवरा मी तुझ्या साठी मी माझ्या आई वडिलांना सोडणार नाही,
माझ्या आई वडील माझ्यासाठी सर्व आहे मी सोडणार नाही,
तुझ्या सारखी बायको नको, मी हेवड तुमचं ऐकून घेतो आहे माझ्या आई वडिलांच्या संस्कार मुळे तुला तेव्हाच सोडल असतं,
मी खूप समजावून सांगितलं तुम्हाला आता नाही बस,
बायकोला खूप राग येतो
रागाने बोलते आपण, घटस्फोट घेऊ ,असं बोलून निघून जाते.
तुझ्या आईने लेकीला पाठिंबा दिला म्हणून आपलं नवरा बायकोच नातं
संपल ..तुला कळेल नात बदल खूप वेळ झाले असेल....
अजून वेळ गेली नाही विचार करून सांग... ती ऐकत नाही,
नवरा निघून जातो आपल्या घरी......
सासरवाडीत काय झालं सांगत नाही, आई वडील उगाच टेन्शन घेतील म्हणून....
काही दिवसांनी घटस्फोट होतो दोघांच,
बायको आपली माहेरी राहाते....
दोन तिन महिन्यांनंतर बायकोच्या भावाच लग्न होतं.....
नवीन नवीन नणंद भावजय छान राहायचे, थोडे दिवासाने
वहिनी ला कळल नणंदबाईच घटस्फोट झाले आहे...
तरीही काही नाही बोलत तिला वाटत जाऊदे नणंदबाईच आयुष्य आहे..
नणंद, एक दिवस, एकदम दार न वाजवता रुममध्ये जाते,
हे वहिनी ला आवडत नाही, वहिनी बोलून दाखवते,ताई तुम्हाला कळत नाही का आम्ही दोघं एकत्र असल्यावर असे येण चुकीचे आहे, दार वाजवून येत जावा, नणंदेला खूप वाईट वाटत,
तिला आठवतं आपण पण नणंदेच किती वेळा अपमान केला आहे.
दुसऱ्या दिवशी , वहिनी स्वयंपाक करत असते, नणंदेला आवाज देते ताई तुम्ही मदत करा, पाहुणे येणार आहेत, हो वहिनी करते मदत,
तिला आठवतं नवऱ्याच्या घरी पोरणपोळी सासूबाई बनवत होते...
मी सासू ला कधी मदत केली नव्हती.... आज वहिनी च्या माहेरच्या लोकांन साठी स्वयंपाक बनवत आहे....
वहिनी माहेरच्या आले थोडे वेळ गप्पा मारल्या नंतर जेवणं केलं
वहिनी आई मी माझी आई गप्पा मारत बसलो,
पुरुष मंडळी बाहेर अंगणात बसून गप्पा मारत बसले...
आम्ही घरात वहीनी चे रूममध्ये बसून गप्पा मारत बसलो...
थोडे वेळाने झोप येत होती म्हणून आई मी उठून गेले..
मी किचनमध्ये पाणी घेईला जात होते वहिनी ची आई सांगत होती,
आपल्या लेकीला अग पोरी तुझ्या नवरा नवऱ्यासोबत नीट राहा काळजी घे
सासू सासरे ना आई वडील समज तुझ्या नणंदेला बहिणसारख,
तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्ये सासू थोडं वाईट बोलत असेल ऐकून घे तुझी आई बोलत आहे अस समज....
तु लहान होती तेव्हा मी तू चूक केली मारत होते ना, सासू ओरडत असेल तर वाईट मानु नको..... सासू सासरे दीर नणंद, तुझीच आहेत, आम्ही माहेरच्या लोक शेवट पर्यंत जाणार नाही.... तुझ्याच सासरच्या लोक शेवट पर्यंत जाणार आहेत.
नवऱ्याच्या नातेवाईक कोणी असो अपमान करू नकोस.....
दुसऱ्यांच ऐकून आपलं संसार उद्धवस्त करून घेईच नाही......
वहिनीच्या आई बोल ऐकून.. आपल्या रूममध्ये विचार करत बसली
खरंच मी काय केलं माझ घर मीच तोडल...
वहिनीची आई किती चांगली आहे.. माझी आई माझ संसार उद्धवस्त केलं
रडत होती, आई गेली माझी लेक का रडत आहे....
अग पोरी का रडतेस कोण काय बोल का..
बघतेय मी सांग तरी..लेक रडत रडत आई माझ संसार का उद्ध्वस्त केल ग
तू वहिनी च्या आई सारख समजून सांगितल असत मी सासरी असते...
मला तू माहेरी का घेऊन आलीस......
आता मला कळल वेळ निघून गेला आता.
माझा नवरा दुसर लग्न केला.
माझ्या नवऱ्याला दुसरी बायको चांगली भेटली आहे
ते खूप सुखी आहेत...
मी घटस्फोट घेऊन खूप मोठी चूक केली आहे......
परत तर मी कस जाऊ.... मी कोठे जाऊ सांग
ऐक पोरी तु माहेरी आहेस तुला कोण आहे तुझ सांभाळ करण्यासाठी
आम्ही किती दिवस तुझ्या सोबत राहणार.. म्हणून सांगत आहे भाऊ वहिनी, त्याचं ऐकत जा.. आम्ही आई वडील किती दिवस तुझ्या सोबत असू एक दिवस मरणार आम्ही...... आयुष्याभूर नसणार तुझ्या सोबत..
आई हे मला माझ्या लग्नानंतर मला असे सांगितले असते.. मी आज सासरी असल्या असते, माझा नवरा खूप चांगला होता, सासूबाई आईपेक्षा किती जीव लावायची. तुझ ऐकून माझ संसार उद्धवस्त करून घेताला....
तु मला समजून सांगितले असते आज माझ घटस्फोट झाला नसता.
माझा नवरा किती समजुन सांगत होता मी ऐकले नाही...
तुझ्या मुळे माझा संसार उद्धवस्त झाला...........
जिथं एका आईच्या चुकीच्या पाठींब्यामुळे स्वतःची मुलगी सासरहुन कायमची माहेरी आली.मुलींना आईने किती पाठीशी घालावं किंवा मुलीच्या संसारात आईने का म्हणून हस्तक्षेप करावा? इतकाच लेकिचा पुळका होता,प्रेम होतं तर
*एखादा घरजावयी शोधायचा सासुच्या तालावर नाचणारा.*
२७/२८ वर्षांपूर्वी ज्या मुलींची लग्न झाली ज्यांना कधी तोंड उघडायची मुभा नव्हती आज तीच मुलीच्या संसारात नाक तोंड खुपसते.आईचं मुलीच्या संसाराची राख करताना दिसत आहे.अशा बायकांनी स्वतःचा भुतकाळ आठवावा.
आपल्यावेळी काय,कसे दिवस होते जिथं सासु सासरे दिर नणंद यांच्यासमोर बोलायची हिम्मत होत नव्हती आणि आज काळ बदलला म्हणून स्वतःच्याच मुलीच्या संसाराचे वाटोळे करायला निघाली.खरंतर हल्लीच्या मुलींनासुद्धा सासरची प्रत्येक गोष्ट माहेरी सांगायची सवयच लागली.ज्या मुलीला स्वतःचा संसार कळला ती मुलगी कधीच सासरचे कुठलेच विषय माहेरपर्यंत नेत नाही.आईचं सुद्धा कर्तव्य आहे मुलीला समजाऊन सांगणं.नाही की तीच्या संसारात दखल देणं.
*मुलीपेक्षा आईच बोलायला वरचढ असेल तर कशाला लेक सासरी राहिल?*
*मुलगी सासर सोडुन माहेरी रहाण्यात कसला मोठेपणा वाटतो?*
सासरी नांदणारी मुलगी आईबापाला सगळ्यात मोठा आनंद देते.
*हल्ली मुलगी एकपट तर आई दुप्पट असंच काहिस चित्र दिसतंय.*
आज सासर सोडुन माहेरी आलेल्या मुलीचं भलेही ऊद्या दुसरं लग्न लावून द्याल पण लक्षात ठेवा तुम्हाला आयुष्यभर पश्चात्तापच होणार... कारण पहिला नवरा तो पहिलाच असतो.आज तीन हजाराची साडी घेणारा ऊद्या तुला हौसेने दहा हजाराची साडी न मागता घेईल.
"तु फक्त संयम ठेव "हेच जर,
तू दुसरं लग्न केलं तर तुला आयुष्यभर ऍडजस्ट " करुनच रहावं लागेल.
*भांडणं कीतीही करा पण त्याचा आवाज घराबाहेर जायला नको.*
*शाब्दिक चकमकीचं युद्ध माहेरच्या रणांगणात मुळीच नेऊ नको *
सासरची गाऱ्हाणी माहेरच्या ऊंबऱ्यात नेऊ नको. संसार करताना कीतीही भांडणं होऊ द्या,पण ती फक्त दोघातच ठेवा.गोडीत असताना अशा विषयांवर बोलत चला.
गोडीगोडीत एकमेकांच काय चुकलं ते बघा. कारण भांडणात फक्त एकमेकांच्या चुकाच दाखवल्या जातात.म्हणूनच वाद विकोपाला जातात.ह्याच गोष्टी गोडीत मिटवून घेता येतात.
दोघांमधील बाद विकोपाला जात असतील तर दोघांपैकी किमान एकाने तरी स्वतःवर संयम ठेवला पाहिजे.समजून घेतलं पाहिजे.तरच संसार सुखाचा होईल.हे स्वानुभवाचे बोल आहेत.
जर मुलींनी छोट्या छोट्या गोष्टी माहेरी सांगितल्या नाहीत तर बरेचसे घटस्फोट वाचतील...
बरेचसे संसार वाचतील....
*एक आम्ही होतो गळ्यातले काळे मणी आणि दोन फुटक्या मंगळसूत्राच्या वाट्यावर संसाराचं आभाळभर आनंद ऊपभोगणारे.*
*कपाळावरच्या कुंकवाला बघुन नवऱ्याला दीर्घायुष्य लाभाव म्हणून देवाला हात जोडणारा आमचा काळ होता.*
दोन वेळेचं पोटाला पोटभर मिळालं तरी आम्हाला समाधान असायचं.
आणि आता....
बंगला,गाडी गडगंज मालमत्ता असुनही सुखी,समाधानी नाही.
हल्लीच्या मुली... यांच्या अपेक्षाच संपत नाही... परिणाम... *घटस्फोट*...
मुलीच्या आईंनो तुम्हाला विचारावं वाटतं...
तुमच्या संसारात तुमच्या पण आई-वडिलांनी अशी कधी लुडबुड केली का? मुळीच नाही.
पुर्वी ईतका छळ, मारहाण व्हायची तरी सुद्धा आईवडील समंजसपणे चार पाहुणे-रावळे गोळा करून वाद मिटवत असे. कारण मुलगी माहेरी घेऊन येणं हे त्यांच्या बुद्धिला कधी पटलंच नाही. वाद झाल्यानंतर माहेरी आलेल्या मुलीला दोन दिवसांत सासरी नेऊन सोडायचे.
राग येईल पण आजची स्त्री बदनाम होत चालली.सासु-सासऱ्यांना मारहाण,नवऱ्याला छळणाऱ्या,त्याला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या , क्षणाक्षणाला कायद्याचा धाक दाखवणाऱ्या मुलींना,बायकांना खरंच धाक राहिलाच नाही.... काही चुकीचे वाटले असल्यास माफी असावी....🙏🥺
अस मी म्हणणार नाही कारण हेच कल युगातील सत्य आहे.....
#बरोबर आहे ना मित्रांनो लाखात एक सत्य💯🔥☝🏻 #Life is not ones more. 🙏जीवन एक सत्य #एक सत्य #भारतीय लग्न #आजच लग्न
