*🌹💞📿श्रीकृष्णा📿💞🌹*
*😌मौनाची खरी ताकद🧘🏻♂️*
🌸बुद्धिमान पुरुष कधीही धनाची हानी, मनातील वेदना, गृहिणीचे दोष, धूर्त व्यक्तीने केलेली फसवणूक आणि अपमान याबद्दल सर्वत्र बोलत नाही. कारण तो जाणतो की काही गोष्टी बोलल्याने हलक्या होत नाहीत, उलट मनावर अधिक ओझे वाढते..
🌺धन गमावल्याची गोष्ट सांगितली तर ऐकणारा हसतो किंवा दया करतो, मनातील वेदना मांडल्या तर लोक त्याला दुर्बल समजतात, घरातील दोष उघड केल्यास आपलीच प्रतिष्ठा कमी होते, धूर्त ठगाबद्दल सांगितल्यास इतरांना हसण्याचा विषय मिळतो,
आणि अपमानाची कहाणी पुन्हा पुन्हा आठवल्याने मन अधिक दुखावते..
🌹म्हणून खरा बुद्धिमान व्यक्ती स्वतःच्या जखमा स्वतःच भरून काढतो, तो शांतपणे निरीक्षण करतो, अनुभवातून शिकतो आणि पुढच्या वेळी तसाच प्रसंग टाळण्यासाठी आपली बुध्दी अधिक मजबूत करतो..
🙂↕️— दुःखात मौन पाळणे, अपमानात संयम राखणे, आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःला उंचावणे, हीच खरी शहाणपणाची खूण आहे..!!✍🏻
*संचितयोग्य गोविंदधाम बहुउद्देशीय संस्था🙏🏻*
*🌹💞जयश्री कृष्णाजी दंडवत प्रणाम शुभ सकाळ आपला दिवस आनंदी मंगलमय् हो📿🙏🏻*
#महानूभाव पंथ #🙏 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 🙏 #जय श्री कृष्णा महानुभाव पंथ #महानुभाव पंथ #सु-प्रभात🌅शुभ सकाळ🌄Good morning
