🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌾
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*♻संस्कारमाला♻*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*⚜आठवणीतील बोधकथा⚜*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🎀 मित्र 🎀*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला.
कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते. अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली. इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
*🔰तात्पर्य- लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते. तसेच होणारे नुकसान टाळता येते.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/मराठीचे-शिलेदार-585257238244686/
🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌾 #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰

Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.