https://batminews.com/navi-mumbai-international-airport/ #latest news

Navi Mumbai International Airport
आज (8 ऑक्टोबर 2025) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport ) भव्य औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री आणि विविध विधिमंडळ पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनानंतर, मुंबई-नवी मुंबई क्षेत्रातील हवाई वाहतुकीचा मोठा भार आता या नवीन विमानतळावर येणार आहे. या विमानतळामुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठी भरभराट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.