विदर्भ क्रिकेट संघाची अभिमानास्पद कामगिरी!
मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर विदर्भ क्रिकेट संघाने रणजी करंडकापाठोपाठ यंदाच्या इराणी चषकावर देखील आपले नाव कोरले आहे. नागपूर येथे पार पाडलेल्या 'इराणी चषक 2025'च्या अंतिम सामन्यात 'रेस्ट ऑफ इंडिया' संघावर 93 धावांनी विजय मिळवून विदर्भाने तिसऱ्यांदा या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. या ऐतिहासिक यशाबद्दल विदर्भ क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा! भविष्यात भारतीय क्रिकेट संघाला विदर्भ रणजी संघाच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू लाभतील, असा विश्वास आहे.
#महाराष्ट्र
