🚩⚔️
जिजाऊंच्या नजरेनं
स्वप्न स्वराज्याचं पाही
तळपत्या तलवारी
रक्त अभिषेक वाही!!४!!
सिंह गर्जना ऐकता
निसर्गाचा हा दुजोरा
सह्याद्रीच्या दगडांनी
केला झुकून मुजरा!!५!!
काळोखाची आवस ती
झाली मांगल्याची दास
लक्षवेधी गरूडाला
फक्त जिंकण्याचा ध्यास!!६!!
फौज रांगडी मावळ
धुव्वा उडवी स्वा-यांची
करी उद्ध्वस्त वैरी
युक्ती गनिमीकाव्याची !!७!!
स्वराज्याच्या देव्हा-यात
धन पर-स्त्री पूजले
पदराला छेडणारे
बाहू पोलादी छाटले !!८!!
स्वराज्याचं तोरण हे
अबाधित राहो दारी
हीच मंगल कामना
मरताना तुझ्या ऊरी!!१०!!
यज्ञकुंड जीवनाचं
त्यात स्वप्नांची आहूती
प्रजा सुखी पाहणारा
एकमेव शिव शंभु छत्रपती!!११!!
✍️🖊️🔥कविता - रेखा पोपटराव चव्हाण #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त

