#🙏शिवदिनविशेष📜 ⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 ४ डिसेंबर इ.स.१६७९ शंभूराजे अखेर पन्हाळ्याला परतले औरंगजेबाने दिलेरखानाला गुप्तपणे निरोप पाठविला की , "शंभूराजेला कैद करुन दिल्लीला पाठवा !" अन् ही बातमी खुद्द संभाजीराजांना समजली ! संभाजीराजांनी ठरवलं इथून निसटायचं ... अखेर येसूबाईसाहेबांनी पुरुषाचा पोषाख केला आणि रात्रीच्या अंधारांतून शंभूराजे सहकुटुंब पळाले ( दि. २० नोव्हेँबर १६७९). त्यांनी तडख विजापूर गाठले . तिथून पुढे महाराजांकडून न्यायला आलेल्या मंडळींस येऊन सामील झाले ( दि. ३० नोव्हेंबर १६७९). तेथून तडक लांबच्या दौडी मारत दि. ४ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे अखेर पन्हाळ्याला येऊन दाखल झाले . संभाजीराजे परत आलेले ऐकून महाराजांस अत्यंत आनंद झाला . ते युवराजांना भेटायला पन्हाळगडास निघाले . 📜 ४ डिसेंबर इ.स. १६८२ रणमस्तखानाने कल्याण काबीज केले. त्याच्याशी मुकाबला करण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांनी रूपाजी भोसले आणि निळोपंत पेशवे यांना रवाना केले. त्यांच्याबरोबर १० हजार स्वार व १२ हजार पायदळ होते. दिनांक ४ डिसेंबर रोजी बहादूरखान व या सैन्यात लढाई झाली. कल्याण-भिवंडीपासून ५ मैलांवर असणाऱ्या मेहेंदळी गावात मराठयांच्या दोन हजार स्वारांनी मुघल ठाण्याची लुटालूट केली होती. त्यावेळी मुकर्रबखान मराठयांना तंबी देण्यासाठी धावला. मुकर्रबखान आणि मराठे यांच्याता मेहेंदळी गावाच्या अलीकडे ३० कोसांवर असलेल्या उरण#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:15
