#🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६५ ( कार्तिक वद्य सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, रविवार ) छत्रपती शिवाजी महाराज मिर्झाराजे यांच्या छावणीत दाखल! राजे शिवराय तहानंतर विजापूरच्या मोहिमेसाठी सुमारे ९-१० हजाराच्या फौजेसह मिर्झाराजांच्या छावणीत दाखल झाले.. संदर्भ: शि.च.वृ.स ३ पृ ४२ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६६७ गोव्यातील पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींबद्दल छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसरॉयला सावधानतेचे पत्र पाठवले. पोर्तुगीज स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन त्यांचे आरमार उभे करत होते तसे झाले तर तो स्वराज्यासाठी एक धोका होता. त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाइसराॅयला वकीलामार्फत पत्र पाठविले व तसे न करण्याचा इशारा दीला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१६८१ संगमनेरचा ठाणेदार "नारोजी" याने मराठ्यांना अडविण्यासाठी "औंढा" पट्ट्यात वाटा रोखून धरल्या. पण मराठे हुशारीने तिकडे फिरकलेच नाहीत. उलटच्या दिशेने संगमनेरपासून २० कोसावर पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत भोजपुऱ्यात चौथरा वसूल करत निघून गेले व तिथे चकमकही झाली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #१८_नोव्हेंबर_१७७२ श्रीमंत थोरले माधवराव यांचे निधन. वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांनि इहलोकची यात्रा संपली. तसेच रमाबाई पण त्यांचे बरोबर सती गेल्या. श्रीमंत माधवराव पेशवे यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मध्ये क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
00:28
