ShareChat
click to see wallet page
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳ 📜 १ ऑक्टोबर इ.स.१६५७ ( अश्विन शुद्ध चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, गुरुवार ) शिवराय कल्याणच्या दिशेने रवाना झाले ! शहाजहानच्या आजारामुळे उत्तरेचे राजकारण तापू लागले होते. औरंग्याला सुद्धा दक्षिणेस रस उरला न्हवता. त्यामुळे ह्या स्थितीचा फायदा उचलण्याचे ठरवून आपल्या हशंबखान या सारदारास कल्याण भिवंडीच्या मोहिमेवर पाठवले. मात्र मोगली सरदार मोहम्मद युसूफ सुद्धा कल्याण चा ताबा घेण्यासाठी आला असता दोघांची गाठ पडून उडालेल्या चकमकीत हशंबखान धारातीर्थ झाल्याचे वृत्त कळताच महाराज कल्याण - भिवंडी च्या दिशेने जाण्यास राजगड उतरले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻 https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/ #🚩शिवराय #🚩छत्रपती संभाजी महाराज स्टेटस🙏 #📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #🙏शिवाजी महाराज वॉलपेपर https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1 शिव दिनविशेष Video Link🔗 https://youtu.be/Z87lukRhmt4 📜 १ ऑक्टोबर इ.स.१६७७ मराठ्यांच्या इतिहासातील एक गूढ आणि अतर्क्य घटना म्हणजे शंभुराजेंचे दिलेरखानाच्या गोटात जाणे. लढाईत मराठ्यांचा पराभव करता येत नसल्याने औरंगजेबाने इतर मार्गाने त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न चालवले होते.मुघल सुभेदार बहाद्दूर खानाने शिवाजी महाराजांच्या सैन्याशी अनेक लढाया केल्या होत्या, पण त्याला हवे तसे यश मिळाले नव्हते.उलट सतत अपयशी ठरल्याने मुघल दरबारात त्याची अपप्रतिष्ठा झाली होती.त्यातच औरंगजेबाला हेरामार्फत शंभुराजे नाराज असल्याची बातमी त्याला समजली.या संधीचा लाभ घेण्यासाठी औरंगजेबाने एक योजना बनवली.15 सप्टेंबर 1677 च्या दरम्यान त्याने दख्खनचा सुभेदार बहाद्दूरखानाला दरबारी परत बोलावले आणि त्याच्या जागी दिलेरखान या अनुभवी सेनापतीची निवड केली.पुढच्या काळात दिलेरखानाने शंभुराजेंशी पत्रव्यवहार करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले.बहादूर खानाला परत बोलावून त्या जागी दिलेरखानाची नेमणूक केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७११ चंद्रसेन जाधव हे शाहूंराजांकडून महाराणी ताराबाईंना सामील झाले. महाराणी ताराबाईनी चंद्रसेन जाधवांचे सहर्ष स्वागत केले. शाहू राजांची बाजू यावेळी फारच कमकुवत होती. चंद्रसेन जाधवरावांच्या अगोदर सावंतवाडीचे सावंत, आंग्रे, खंडेराव दाभाडे अशी मातबर मंडळी ताराबाईना मिळाली होतीच. चंद्रसेन जाधवांनी हैबतराव निंबाळकरास चिथावून त्यास ताराबाईंच्या पक्षास आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अशा वेळी परसोजी भोसले व चिमणाजी दामोदर हे दोन सरदार शाहू राजांच्या बाजूचे राहिले, पण ते खानदेशकडे होते. शाहू राजांचा पक्ष फारच कमकुवत झाला होता. मोठी दुरावस्था प्राप्त झाली होती. तरी शाहू राजे डगमगले नाहीत. त्यांनी चंद्रसेन जाधवांकडील सेनापतीपद काढून ते ता. १ ऑक्टोबर १७११ रोजी त्यांचे बंधू संताजी यास दिले. बाळाजी विश्वनाथांनी यावेळी पुढे सरसावून शाहू राजांची बाजू सावरून धरली. बाळाजींनी पिलाजी जाधव, पुरंदरे यांच्या सहाय्याने सावकारांकडून कर्ज काढले. फौज उभी केली. हीच फौज पुढे “हुजूर फौज”, “हुजूर पागा” म्हणून प्रसिद्ध पावली. सावकारांच्या कर्जास तारण पाहिजे म्हणून शाहू राजांकडून बाळाजींनी पंचवीस लाखाचा सरंजाम करून घेतला (२१ ऑगस्ट १७११). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७२४ साखरखेर्डा लढाई - निझामाने मोगलांचा पराभव केला दख्खनमधील आपल्या भावी आव्हानाची पुरेपूर कल्पना निजामाला येऊन चुकली. बादशहाने निजामाचा नि:पात करण्यास धाडलेल्या मुबारिजखानाला सामोरे जाण्यासाठी निजामाने बाजीरावांच्या साह्याची याचना केली आणि ते तातडीने त्याच्या मदतीला धावून गेले. १ ऑक्टोबर १७२४ला शक्करखेडा लढाईत मुबारिजखानाचा पराभव झाला. निजामाने मराठय़ांना चौथ देण्याचे आश्‍वासन दिले. याशिवाय, या लढाईदरम्यान निजामानिकट वावरल्याने त्याच्या डावपेच आणि विचारसरणीमध्ये जवळून डोकावून पाहण्याची संधी बाजीरावांना मिळाली. या अमूल्य उपहाराचा बाजीरावांनी निजामाबरोबरील भावी लढायांत पुरेपूर उपयोग केला. या विजयामुळेच निजामाच्या दक्षिणेच्या स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले. निजामाने मोगल बादशाह मोहम्मद शाह याला सविस्तर पत्र लिहून माफी मागितली. त्यामुळे बादशाहने त्याला परत दक्षिणेची सुभेदारी बहाल केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७५९ दि. १ ऑक्टोबर १७५९. या दिवशी नानासाहेब पेशव्यांनी समशेरबहाद्दरांना साहेबनौबतीचा मान दिला. समशेरबहाद्दरांनी याआधी कितीतरी वेळा तलवार गाजवली होती. तुळाजी आंग्र्यांच्या मोहिमेत समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी १७५६ रोजी रत्नागिरीचा किल्ला जिंकला. रघुनाथरावांच्या 'अटकेवरील' स्वारीत यांनी दिल्लीची आघाडी सांभाळली. यानंतर बुंदेलखंडात राजा छत्रसालांचे नातू म्हणजे समशेरबहाद्दरांचे मामेभाऊ जगतराय पुत्र हिंदुपताचा मृत्यू झाला. हिंदुपतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुत्रांमधली भाऊबंदकी मिटवून न्याय देण्यात समशेरबहाद्दरांचा महत्त्वाचा वाटा होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१७४९ 'आपले खावंद' म्हणून नानासाहेबांना शाहूमहाराजांबद्दल खूप आदर वाटत असे. इ. स. १७४९ च्या मध्यापासून शाहूमहाराजांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला. शाहूमहाराज सत्तरीच्या आसपास पोहोचले होते. आपले आता फार काळ जगणे नाही म्हणून महाराजांनी ऑगस्ट १७४९ मध्ये नानासाहेबांना साताऱ्यात बोलावून घेतले. दि. १ ऑक्टोबर १७४९ या दिवशी शाहूमहाराजांनी गोविंद खंडेराव चिटणीस (खंडो बल्लाळ चिटणीसांचा पुत्र) यांना बोलावून आपल्या माघारी राज्याच्या कारभाराची यादी म्हणजे एकप्रकारे एक मृत्युपत्रच तयार करून घेतले. आजार बरा होईल असे वाटत नव्हते. यातच चिंतेची बाब म्हणजे शाहूमहाराजांना मुलगा नव्हता. नानांनाच ते आपल्या मुलासारखा मानत असत. आपल्या माघारी राज्य आणि प्रजा सांभाळू शकेल असा अन्य कोणीही सरदार वा विश्वासू व्यक्ती न दिसल्याने शाहूमहाराजांनी नानासाहेबांपासून पुढे 'पेशवाई' ही भट घराण्याकडे कायम वंशपरंपरागत करून दिली व साऱ्या कारभाराची सूत्रे पेशव्यांकडे सोपवली आणि अखेरची निरवानिरव करून दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूमहाराज साताऱ्यात मृत्यू पावले. योद्धा शिवछत्रपती महाराजांपासूनचे भोसल्यांचे जनक राजपद संपले. आता साताऱ्याच्या गादीवर भोसले कुळातीलच कोणालातरी दत्तक घ्यावे लागणार होते. म्हणूनच कोल्हापूरकर, ताराबाई आणि राजारामांचा नातू, शिवाजीपुत्र राजाराम (दुसरे) यांना नानासाहेबांनी दि. ४ जानेवारी १७५० या दिवशी साताऱ्याच्या गादीवर अभिषेक केला. वास्तविक शाहूमहाराजांच्या मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूरची गादी एक करून, पुन्हा 'एकच' अखंड स्वराज्य निर्माण करण्याची नानासाहेबांची इच्छा होती. त्याकरता या नव्या राज्याचा अधिकारी म्हणून कोल्हापूरकर संभाजीराजालाच नेमण्याचा नानासाहेबांचा विचार होता. परंतु आपल्याला गादीवर बसले तरी सारा कारभार मात्र पेशवे नानासाहेबच बघणार, मग आपण नाममात्रच राहणार या चिंतेने संभाजीरावांनी नानासाहेबांच्या या प्रस्तावाला विरोध दर्शवला. त्यामुळे संभाजीराजांशी जास्त वाद न घालता नानासाहेबांनी त्यांचे सावत्र पुतणे, राजाराम यांना सातारा गादीवर बसवले. अभिषेकानंतर महादजीपंत पुरंदऱ्यांच्या मदतीने आणि मोरोबादादा फडणिसांच्या सल्ल्याने नानासाहेबांनी दरबारातील सर्व सरदारांची पुनर्व्यवस्था लावून दिली आणि आपली विश्वासू माणसे सातारा दरबारात ठेवून दि. २२ एप्रिल सन १७५० रोजी नानासाहेब पुण्याला आले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १ ऑक्टोबर इ.स.१८१२ महाराणी ताराबाई भोसलेंची गादी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली संभाजीनंतर कोल्हापूरच्या गादीवर शिवाजी द्वितीय (कोल्हापूर) या दत्तक पुत्राची कारकीर्द इ.स. १७६२ ते १८१३ अशी झाली. याच्या कारकीर्दीत १ ऑक्टोबर १८१२ रोजी कोल्हापूर संस्थानाचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणात्मक करार होऊन ते ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर १८१३ मध्ये शिवाजी महाराज द्वितीय (कोल्हापूर) यांचे निधन झाले. कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे. दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी। ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।। रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली। प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।। 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors . . . 👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇 ☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम || || जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀
🚩शिवराय - TEE CIEII 7 ض٩ = 1 >. ~7~R^114 ய4RRVOR$ & Picifcஎicefd SHIVRaHSKosse CEATED | BY १ ऑक्टोबर इ.स. १६५७ छत्रपती शिवाजी महाराज कल्याण भिवंडीच्या दिशेने किल्ले राजगड येथन रवाना झाले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors TEE CIEII 7 ض٩ = 1 >. ~7~R^114 ய4RRVOR$ & Picifcஎicefd SHIVRaHSKosse CEATED | BY १ ऑक्टोबर इ.स. १६५७ छत्रपती शिवाजी महाराज कल्याण भिवंडीच्या दिशेने किल्ले राजगड येथन रवाना झाले. the qreat maratha warriors the qreat marathauarriors the qreat maratha warriors - ShareChat

More like this