मी म्हटलं.....सतत आठवत राहतात गं आपल्या भेटीगाठी…तर म्हणालीस-असंच असतं रें …आपला आयुष्यातील एक भाग राहून जातो तिथेच …
माझे अनेक भाग झालेत ….एक गाडीतल्या तुझ्या शेजारच्या सीटवर राहून गेलाय…एक त्या मंदिरा आणि शाळेच्या भोवती दुपारच्या शांत किनार्यावर….
ती झाडांची कमान होते ना हिरवीगार….मांडवासारखी
त्या मांडवाखालून आपण गेलो होतो
त्या रस्त्यात पण राहिलाय एक…
एकदा मी फोटो काढत होतो, पानाफुलांचे आणि तू माझे काढलेस नकळत ….तिथं राहून गेला माझा एक तुकडा…
कॅाफीच्या टेबलाभोवती …तू बोलत होतीस …मी ऐकत होते….तिथं घुटमळतोय थोडा थोडा जीव…
पुन्हा भेटू म्हणून तू सोडलंस त्या वळणावर …वाट पाहतोय माझा एक भाग तिथे….
तुझं माझं बोलणं झालं फोनवर …longgg calls तिथे पण राहिलेत काही तुकडे….
इतके तुकडे होऊनही या सगळ्याची जाणीव असलेला जो तुकडा राहिलाय ना माझा …..त्याला सुद्धा ओवाळून टाकायचंय तुझ्यावर अन् मोकळं व्हायचंय आता……
तेवढ्यासाठी पुन्हा भेटशील ? #✍🏽 माझ्या लेखणीतून
