वेळ खूप लागतो परक्याना आपल करायला
पण फक्त एक क्षण लागतो आपलेपणाचं नातं तुटायला!!
विश्वासावर नाती घट्ट जुळतात
दूरच्या व्यक्तींना आपल करून देतात!!
जिथं संवाद थांबतो तिथ संपतो खेळ विश्वासाचा
तेव्हा डाव सुरु होतो खोट्या नात्याचा!!
तुझं माझं करत चूक शोधत जरासा गैरसमज होतो
मीच खरा म्हणत म्हणतं नकळत नात्यात दुरावा वाढतो!!
एखाद्याची भूमिका, दृष्टीकोन समजून घेण्यात चुकतो
दोन अक्षराची" माफी " मागायला मात्र लाजतो!!
वाढत जातो गैरसमज जेव्हा रहातो आपण शांत
नाती दुरावतात आणि शेवटी उरतो एकांत...."
#❤️Love You ज़िंदगी ❤️