दो दिल एक जान (भाग 36)
"आज किती दिवसातून घरात चैतन्य आल्या सारखं वाटतंय नाही का???" सविता काकु सकाळी सकाळी सुरु असलेली लगबग पाहून म्हणाल्या....
"हो ना.... गेला एक महिना अर्णव आरोही दिल्लीला गेल्या पासुन घरात चैनच पडत नव्हता... आपण एवढे सगळे आहोत पण ते दोघे नव्हते तर घरातला आनंदच जणू हरवला होता..." सुमित्रा म्हणाल्या...
"खर आहे, आरोहीचा पायगुणच तसा आहे, ती घरात आली अन् आनंद घेऊनच आली तिच्या येण्यामुळे जणू घराला घरपण आलं.... ती घरात असली की पूर्ण घरात कसा जीव आल्या सारखा वाटतो... इतक्या मोठया आजारातून बरी होऊन आली आता परत कोणतं संकट नको तिच्यावर.... दोघांना पण सुखी ठेव देवा..." सविता ताई भावुक होऊन म्हणाल्या...
त्याचं वेळी बाहेर कारचा आवाज आला तसे सगळेच दरवाजात आले.... अर्णवणे आत्ताही तिला हात दिला... तशी ती त्याचा हात हातात घेऊन दरवाजाच्या दिशेने आली... डोक्याला स्कार्फ गुंडाळाला होता तब्बेत आधी पेक्षा कृषच झालेली.. चेहरा मलूल झालेला.... तिला समोरून येताना पाहून आपोआपच सुमित्रांच्या डोळ्यात पाणी भरलं......
आर्वी आणि मिटू दोघी पण मम्मा करत तिच्या दिशेने धावत गेल्या.... तस तिने त्या दोघींना पण उराशी कवटाळलं.....
"मम्मा तु बरी आहेस ना...." आर्वीने भरल्या डोळ्यांनी तिच्या नजरेत बघत विचारल...
"हो पिल्लु मी ठीक आहे.... तुम्ही दोघी कश्या आहात... मिटू बाळा रोज स्कुलला जातेस ना??" तिच्या गालावर पापी घेत आरोहीने विचारलं...
"हो काकु.... दादाच स्कुल बुडवतो...." तिने लगेचच अद्विकची तक्रार केली....
"आरु अग दरवाजातच मम्माची चौकशी करणार आहात का तुम्ही दोघी.... आम्हांला पण भेटायचंय म्हंटल तिला..." पाठीमागून सविता काकूंचा आवाज ऐकला अन् मग दोघी पण तिच्या पासुन बाजुला झाल्या....
"डॅडू खुप मिस केल मी तुला...." आरोहीला सोडल तशी आर्वीने डॅडूला मिठी घातली....
इकडे सुमित्रा आणि रेणुने आरतीने ओवाळून तीच औक्षण केल....
"आई आहो हे औक्षण वगैरे कशाला... मी काय लढाई जिंकून आलेय का??" आरोही हसतच म्हणाली...
"हो खुप मोठी लढाई जिंकून आलीयेस तु..... ये आत आधी...." म्हणत सुमित्रानी तिला उराशी कवटाळलं...
त्यानंतर रेणुची सविता काकूंशी गळा भेट घेऊन ती आत आली.... थोडा वेळ तिच्या तब्बेतीची चौकशी करून झाल्यावर ती मग फ्रेश व्हायला खोलीत गेली.... एक महिन्या पूर्वी जशी सोडून गेली होती अगदी तशीच होती तिची रूम आत्ता कुठे आपल्या घरी आल्यानंतर तिला जरा बर वाटतं होत....
रूम मध्ये येऊन तिने डोक्याला गुंडाळालेला स्कार्प बाजुला केला अन् पुन्हा एकदा स्वतःला पाहून धक्का बसला तिला.... आणि त्याचं वेळी आर्वी रूम मध्ये आली..... मम्माला असं पाहून तिच्या काळजात धस्स झालं......
"मम्माssssss......." इतकंच बाहेर पडलं तिच्या मुखातून..... पुन्हा दोघींच्या ही डोळ्यात अश्रुंचा महापूर लोटला.... तेवढ्यात अर्णव तिथे आला अन् त्याने दोघींची पण समजूत काढली......
पूर्ण भाग आणि कथा प्रतिलिपी अँपवर वाचा..
https://marathi.pratilipi.com/series/kj1kwrjqefoe?language=MARATHI&utm_source=android&utm_medium=content_series_share
#✍मराठी साहित्य #📚मराठी रोमांचक कथा🧐 #☺️प्रेरक विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🌹प्रेमरंग
भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!
दो दिल एक जान... « Rani chavan | प्रतिलिपि
Read & share the Marathi story Do dil ek john written by Rani Chavan from Pratilipi ✓ Rating: 4.92 / 5.0 ✓ 164 Chapters ✓ 423856 Reads