ShareChat
click to see wallet page
"तीन उपदेश" एक गरीब माणूस आपल्या पत्नीसोबत एका छोट्या गावात राहात होता. जीवन इतकं कठीण होतं की अनेक वेळा खायला देखील काहीच नसायचं. एक दिवस त्याने कामाच्या शोधात गाव सोडायचं ठरवलं. जाताना तो आपल्या पत्नीला म्हणाला, "मी आता लांब प्रवासावर चाललो आहे. मी सदैव तुझ्या प्रती निष्ठावान राहिलो आहे. माझ्या अनुपस्थितीत तू देखील माझ्या प्रती निष्ठावान राहशील का?" पत्नीने मानेने होकार दिला. तो माणूस खूप दूर गेला आणि एका व्यापाऱ्याच्या घरात नोकरीला लागला. पण अट अशी होती.. त्याचा सगळा पगार व्यापाऱ्याच्या जवळ साठवला जाईल आणि काम सोडताना एकदम मिळेल. २० वर्षे उलटून गेली. एक दिवस तो व्यापाऱ्याला म्हणाला, "मालक, आता मी घरी परत जायचं ठरवलं आहे. कृपया माझं सगळं साठवलेलं वेतन मला द्या." मालक म्हणाला, "तुला दोन पर्याय आहेत... एकतर तुझं संपूर्ण वेतन घे, किंवा माझ्याकडून तीन महत्त्वाचे उपदेश घे. पण दोन्हीपैकी एकच गोष्ट मिळेल." त्या माणसाने दोन दिवस विचार केला आणि म्हणाला, "मालक, मला तुमचे तीन उपदेश द्या. मला पैसे नकोत." मालक हसत म्हणाला, "मग लक्षपूर्वक ऐक: पहिला उपदेश: कधीही शॉर्टकट निवडू नकोस, तो कितीही सोपा वाटला तरी. लांबचा मार्ग अनेकदा अधिक सुरक्षित आणि लाभदायक असतो. दुसरा उपदेश: कधीही घाई करू नकोस. पूर्ण गोष्ट समजून घे, मग निर्णय घे. तिसरा उपदेश: एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवण्याआधी सर्व सत्य जाणून घे." मालकाने त्याला तीन पोळ्या दिल्या.. दोन प्रवासात खाण्यासाठी आणि एक मोठी पोळी घरी पोहोचल्यावर पत्नीबरोबर वाटून खाण्यासाठी. आता तो माणूस लांब प्रवासासाठी निघाला. रस्त्यात एकाने त्याला सांगितलं की एक छोटा मार्ग आहे ज्याने तो लवकर घरी पोहोचू शकतो. त्याला पहिला उपदेश आठवला... त्याने लांबचा आणि सुरक्षित मार्ग निवडला. नंतर समजलं की त्या छोट्या मार्गावर एक हिंस्र प्राणी होता, जो त्याला मारू शकला असता. रात्री एका अज्ञात व्यक्तीने त्याला घरात आसरा दिला. मध्यरात्री घरात काही आवाज आले. तो उठून पाहायला गेला, पण त्याला दुसरा उपदेश आठवला... "घाई करू नकोस". तो थांबला. सकाळी कळलं की रात्री घरात वाघ घुसला होता. त्याच्या न बघण्यामुळेच त्याचा जीव वाचला. शेवटी तो आपल्या गावात पोहोचला. घराजवळच्या खिडकीतून बघितलं तर त्याला दिसलं की त्याची पत्नी एका पुरुषाला मिठी मारतेय आणि त्याच्या गालाचं चुंबन घेत आहे. तो खूप संतापला, निराश झाला आणि थकल्यासारखा तसाच निघून गेला. मग त्याला तिसरा उपदेश आठवला.. "पूर्ण सत्य जाणण्याआधी मत बनवू नकोस." तो परत गेला आणि दरवाजावर टकटक केली. पत्नीने त्याला पाहून आनंदाने धावत येऊन मिठी मारायला लागली पण तो थांबला आणि विचारलं, "तू माझ्या अनुपस्थितीत दुसऱ्या पुरुषाला का मिठी मारलीस आणि चुंबन घेतलंस? तू वचन दिलं होतंस!" पत्नी हसून म्हणाली, "आधी घरात या, मी सर्व काही सांगते." "नाही, मला आत्ता सगळं सांग!" त्याने ठामपणे सांगितलं. पत्नी म्हणाली, "जेव्हा तुम्ही गेलात, तेव्हा मी गरोदर होते. आपला आता वीस वर्षांचा मुलगा आहे. तोच मुलगा होता, ज्याला तुम्ही खिडकीत पाहिलंत. मी त्याला कामावर जाण्यापूर्वी गालावर चुंबन घेतलं, अगदी तसंच जसं तुम्ही जाताना माझं चुंबन घेतलं होतं." त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दोघं घरात गेले आणि मग एकत्र जेवायला बसले.. आता त्याने ती तिसऱ्या पोळीची पिशवी उघडली जी मालकाने पत्नीसोबत खायला संगीतली होती. जशी त्याने पिशवी उघडली, त्यामधून त्याच्या वीस वर्षांची संपूर्ण जमा केलेली रक्कम बाहेर आली.. जी त्याच्या मालकाने प्रेमाने लपवून ठेवली होती. शिकवण: प्रत्येक सोपा मार्ग योग्यच असेल असं नाही. घाईत घेतलेले निर्णय अनेकदा तोट्याचे असतात. प्रत्येक गोष्ट जशी दिसते तशीच असेल असं नाही. पूर्ण सत्य जाणल्याशिवाय निर्णय घेऊ नका. #☺️सकारात्मक विचार #🙂Motivation #🎑जीवन प्रवास

More like this