ShareChat
click to see wallet page
फाऊंडेशन #फाऊंडेशन *🌸 समर्थ सोशल फाउंडेशन 🌸* *"समाजासाठी, माणुसकीसाठी, जीवनासाठी..."* 🙏 समर्थ सोशल फाउंडेशन ही संस्था "व्यसनमुक्त भारत", "शुगरमुक्त भारत", "शिशुरक्षा", "रोगमुक्त अभियान" यांसारखी विविध समाजोपयोगी मोहीम राबवते आहे. यामधून शेकडो लोकांचे आयुष्य व्यसनमुक्त व शुगरमुक्त होत आहे, आणि अनेक कुटुंबांचे पुनर्निर्माण घडत आहे. यामुळे आम्हाला खूप समाधान आणि ऊर्जा मिळते. 📌 पण आजची सर्वात वेदनादायक आणि दुर्लक्षित समस्या म्हणजे - वृद्धांची परवड. आज एकल कुटुंबपद्धतीमुळे अनेक आई-वडीलांना त्यांच्या वृद्धापकाळात एकाकी जीवन जगावे लागत आहे. तेच आई-वडील... ▪️ ज्यांनी आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, ▪️ कधी त्यांचे डोळेही ओले होऊ दिले नाही, ▪️ मुलांसाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले... पण आज... त्याच आई-वडिलांना स्वार्थ, संपत्ती आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली घराबाहेर काढले जाते, त्यांना निराधार केले जाते. 💔 ही वेदना पाहून समर्थ सोशल फाउंडेशनने एक पाऊल पुढे टाकले आणि *👉 “शिवशंभू वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्र”* 📍 वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे सुरू केले आहे. 📝 *प्रवेशासाठी अटी* : 1. लाभार्थ्याचे वय किमान 60 वर्ष असावे 2. निराधार, एकाकी, किंवा मदतीस पात्र वृद्धांना प्राधान्य 3. कुटुंबाची आर्थिक माहिती आवश्यक 4. स्थानिक ग्रामपंचायत/सरपंच शिफारस किंवा पोलीस स्टेशन नोंद आवश्यक 📑 *आवश्यक कागदपत्रे* : आधार कार्ड ओळखपत्र साइज फोटो रेशन कार्ड जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड 💠 *शुल्क* : 🔹 निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वृद्धांसाठी संपूर्ण सेवा मोफत 🔹 इतर लाभार्थ्यांसाठी नाममात्र फी आकारली जाईल 🤝 *एक सामाजिक बांधिलकी* : आपण या कार्यामध्ये आर्थिक, साहित्यिक किंवा स्वयंसेवक स्वरूपात मदत करून वृद्धांना पुन्हा एक आधार देऊ शकतो. 🙏 *मदत करा आणि माणुसकी जपा...* 📲 9146542296 🔗 व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा https://chat.whatsapp.com/DSPtZJ8GD82Hwj4j1LvYmj
फाऊंडेशन - ArenRi-ieeRI समर्थ सोशल फाऊंडेशन संचलित शिवशंभू समथ वृध्दाश्रम व विरंगुळा केंद्र कोल्हापूर  JATR எ ஈன f 44- 9146542296 ArenRi-ieeRI समर्थ सोशल फाऊंडेशन संचलित शिवशंभू समथ वृध्दाश्रम व विरंगुळा केंद्र कोल्हापूर  JATR எ ஈன f 44- 9146542296 - ShareChat

More like this