*गरीबी-* जशी ट्रेन सुरु झाली, एक बाई आणि तिचा पती एक लोखंडी पेटी घेऊन घाईघाईने गाडीत चढले. बाई तर दरवाजाजवळच बसली पण माणूस चिंतातुर उभा होता. त्याला माहित होते की त्यांच्या जवळ जनरल डब्याचे तिकीट आहे आणि हा रिज़र्वेशनचा डब्बा आहे. टीसी ला तिकीट दाखवत त्याने हात जोडले. "हे जनरलचे तिकीट आहे. पुढच्या स्टेशन वर जनरल डब्ब्यात जाऊन बसा, नाहीतर आठशे ची पावती बनेल." असे बोलून टीसी पुढे निघून गेला. पति-पत्नी दोघे मुलीला पहिला मुलगा झाला म्हणून त्याला बघायला चालले होते. शेठनी मोठ्या मुश्किलीने दोन दिवसांची सुट्टी आणि सातशे रुपये एडवांस दिले होते. पत्नी व लोखंडी पेटी घेऊन जनरल डब्यात प्रयत्न केला पण घुसू शकले नाही. लाचार होऊन स्लिपर क्लास मध्ये आले होते. "साहेब, पत्नी व सामान घेऊन जनरल डब्यात चढ़ू नाही शकलो. आम्ही येथेच कोपऱ्यात उभे राहू. खूप मेहरबानी होईल." टीसी ला शंभर रुपयांची नोट देत म्हणाला. "शंभर मध्ये काही होत नाही. आठशे काढ नाहीतर उतरून जा." "आठशे तर गुड्डीच्या बाळंतपणाला ही लागले नाही साहेब. नातूला बघायला चाललो आहोत. गरीब लोकं आहोत, जाऊ द्या ना साहेब." यावेळी पत्नी ने म्हटले "मग असं करा, चारशे काढा. एकाची पावती बनवून देतो, दोघे बसून रहा." "हे घ्या साहेब, पावती राहू द्या." दोनशे रुपये देत माणूस बोलला. "नाही-नाही पावती तर बनवावीच लागेल. वरूनच हुकूम आहे. पावती तर बनेलच. चला, लवकर चारशे काढा, नाहीतर स्टेशन येत आहे, उतरून जनरल डब्यात निघून जा." टी सी यावेळी काहिसे रागावून बोलला. माणसाने चारशे रुपये असे दिले जसे काळीज काढून देत आहे. दोघे पति-पत्नी उदास, रडवेले होऊन असे बसले होते, जसे नातू चा जन्म झाल्यामुळे नाही तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी चालले आहेत. कसे अॅडजस्ट करतील हे चारशे रुपये? परतीच्या तिकिटासाठी व्याह्यांकडून पैसे मागावे लागतील का? नाही-नाही. शेवटी पति बोलला- "शंभर- दिडशे तर मी जास्तच आणले होते. गुड्डी च्या घरी पायीच जाऊ. सायंकाळी जेवायचं नाही. दोनशे तर अॅडजस्ट होऊन जातील. आणि हा, येतांना पॅसेंजर ने येऊ. शंभर रूपये वाचतील. एक दिवस जरूर जास्त लागेल. शेठ पण ओरडेल. पण मुन्ना साठी सर्व सहन करुन घेईन. पण तरीही हे तिनशेच झाले." पत्नी म्हणाली, "असे करुया, बाळाच्या हातात आजी-आजोबांकडून जे शंभर-शंभर देणार होतो ना, आता दोघे मिळून शंभरच देऊ. आपण वेगळे थोडेच आहोत. झाले ना चारशे अॅडजस्ट." "पण बाळाला द्यायचे कमी करने...." आणि पतिच्या डोळ्यात पाणी आले. "मन कशाला जड करता वो, गुड्डी जेव्हा बाळाला घेऊन घरी येईल, तेव्हा दोनशे जास्त देउन देऊ." असं म्हणताना तिचेही डोळे भरून वाहू लागले. मग डोळे पुसत म्हणाली- "जर मला कुठे मोदीजी भेटले तर सांगेन- "इतक्या पैशांची बुलेट ट्रेन चालवण्या पेक्षा इतक्या पैशांनी प्रत्येक ट्रेन मध्ये चार-चार जनरल डब्बे लावून द्या, ज्यामुळे आपल्या सारख्यांना तिकीट असूनही बेइज्जत व्हावे लागणार नाही व बाळाच्या हातात द्यायचे शंभर रुपये ही कमी होणार नाहीत." तिचे डोळे परत वाहू लागले. "अगं वेडे, आपण गरीब माणसं आहोत, आम्हाला मतदान करण्याचा तर अधिकार आहे, पण सल्ला देण्याचा नाही. रडू नको. (एक नम्र विनंती आहे, ज्याची ही कथा वाचून झाली त्याचे या घटनेशी काही घेणे नसले तरी ही कहानी शेयर करा, कॉपी पेस्ट करा पण संबंधित व्यक्तींपर्यंत ही पोहोचू द्या जेणेकरून रेल्वे मंत्रालय जनरल डब्यांचीही परिस्थिती समजू शकेल ज्यात प्रवास करणारा एक गरीब वर्ग ज्याचे अनंतकाळापासून शोषण होत आले आहे. एक पाऊल परिवर्तनाकडे. #🙏प्रेरणादायक / सुविचार
2.1k जणांनी पाहिले
2 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post