३ एप्रिल .... जगाच्या इतिहासतील एक काळाकुट्ट भयाण दिवस ........... निश्चयाचा महामेरु ढासळला सह्याद्रीचा कडान-कडा व्याकूळला रायगडीचा देव आमुचा आमुचा ध्रुवतारा निखळला... १६८० साली याच दिवशी शौर्य,धैर्य, पराक्रम,नितीमत् ता,प्रजाप्रेम,स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मी अलंकृत,महापराक् रमी,महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले.. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक,अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम.. अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय पण गद्दरानो ख़बरदार,हा झंझावत पुन्हा जागृत होईल, लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल, ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल .व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल.. ll करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही ll ll विझून माझी चिता युगे लोटली तरीही विझायचे राहिले निखारे अजून काही ll || जय शिवराय || जय शिवराय || जय शिवराय || मुजरा राज मुजरा 🙏🙏
424 जणांनी पाहिले
3 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post