तुमची भाषा बदला
Tap the Share button in Safari's menu bar
Tap the Add to Home Screen icon to install app
ShareChat
Miss you... ना...!☺ वयानुसार आपण काय काय .. गोष्टी सोडल्या.. *आपण गाभुळलेली चिंच ..* *अनेक वर्षात खाल्लेली नाही* *जत्रेत मिळणारी ..* *पत्र्याची शिट्टी ..* *वाजवलेली नाही.* *चटक्यांच्या बिया घासून ..* *चटके द्यावेत ..* *असं आता वाटत नाही* *सर्कसमधला जोकर आपलं ...* *मन आता रिझवू शकत नाही.* *तसंच कापसाची म्हातारी ..* *पकडण्याचा चार्मही ..* *राहिलेला नाही..* *कारण ..* : *कापसाच्या म्हातारीने ..* *उडता उडता आपला ..* *बालपणीचा काळ सुखाचा..* *स्वत:बरोबर कधी नेला ..* *ते आपल्याला कळलंच नाही.* *आता त्या सहली नाहीत...* *दोन दोन मुलांच्या ..* *जोड्या करून ..* *चालणं नाही..* *विटी दांडू नाही...* *गोट्या*लगोरी* *साबणाचे फुगे नाहीत..* *प्रवासात बोगदा आला तर ..* *एक अनामिक हुरहूर नाही..* *त्या उडणाऱ्या म्हातारीने ..* *हे सगळे आनंद नेले...* *त्याच्या बदली ..* *तिचं वार्धक्य तिने ..* *आपल्याला दिलं...* *म्हणूनच ती अजून उडू शकते...* *आणि आपण जमिनीवरच आहोत.* *लाटेने की काळाने ...* *नेला तो मातीचा किल्ला?* *भोवऱ्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…* *हरवली कुठेतरी ती शाळेतली मूल्यशिक्षणाची वही,* *इवलुश्या मार्कांच्या प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….* *गेले कुठे ते चालताना ..* *“पॅकपॅक” आवाज करणारे ..* *पायातले बूट?* *"मी नाही देणार जा माझं चॉकलेट”* *म्हणत आवळलेली ती ..* *घट्ट मूठ….* *किती जिव्हाळा होता ..* *डोकं टेकवलेल्या ..* *आईच्या हाताच्या उशीत?* : *ब्लँकेटहून जास्त ..* *ऊब होती त्या ..* *मायेच्या कुशीत…* *हरवला तो प्रेमाचा घास….* *“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…* *घरात न सांगता ..* *लपवून लपवून ..* *खाऊ खायचा तो ..* *प्लॅन ठरवलेला?* *गेले कुठे जत्रेतले ते ..* *गोड गोड म्हातारीचे केस?* *छोट्याशा बुटांची ..* *आईने बांधलेली ती ..* *सुटलेली लेस….* *गेली कुठे ती ..* *मामाच्या गावी जाणारी ..* *झुकझुक गाडी?* *शाळेत बडबडगीते गाताना ..* *एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?* *झोपताना पाहिलेला तो ..* *चांदोमामा कुठे हरवला?* *अ आ इ ई ..* *पाटीवर लिहिणारा तो ..* *खडू कुणी पळवला?* *कशाला आलं हे ...* *आपल्याला शहाणपण????* *हरवलं त्यात ते सुंदर बालपण..* *खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना?* *आयुष्यातील काही ...* *अनमोल क्षणांची आठवण ...* *ते क्षण निसटून गेल्यावरच प्रकर्षाने होते...* *पण बालपणीच्या काही ..* *आठवणी,* *मनाच्या कोपऱ्यात ..* *अजूनही दाटलेल्या असतात,* *त्यांना हलकेच गोंजारलं असता ..* *त्यांची सय अधिकच गडद होते...* *आपलं मनही किती विचित्र असतं ना...* *जेव्हा लहान असतो तेव्हा पटकन मोठं व्हावंसं वाटतं...* *शाळा सोडून बाबांसारखं ...कामावर जावंसं वाटतं...* *मात्र आता मोठं झाल्यावर ...* *पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात ..* *आणि नकळत डोळ्यात पाणी येतं..* *आय मिस माय चाइल्डहूड यार* *कोई लौटा दे मुझे...* *बीते हुए दिन..* *चला मन थोडे हलके झाले ..* 🙏✒️✍️sandy✍️
#

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन

✒️✍️सॕडीच्या लेखणीतुन - ShareChat
1.3k जणांनी पाहिले
9 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post