ShareChat
click to see wallet page
search
देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिलाय. संसदेने 'सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५' मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आलीय. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति १,००० स्टिकमागे २००-७३५ रुपयांवरून थेट २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेय. ही वाढ सिगरेटच्या प्रकारावर आणि लांबीवर अवलंबून असेल. खैनीवरील शुल्क २५% वरून १००% पर्यंत, तर हुक्का तंबाखूवर २५% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सध्या बाजारात १८ रुपयांना मिळणारी एक सिगरेट लवकरच ७२ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे विधेयक सादर केले होते. #ताज्या बातम्या #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ब्रेकिंग न्यूज #🆕ताजे अपडेट्स #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
ताज्या बातम्या - ShareChat
01:07