उसाच्या रानात कष्टांची उडते धूळ …
हातात विळा, पाठीवर ओझं, आणि
कापडाच्या झोळीत झुलतं तान्हं बाळ...
आई थकते, पण थांबत नाही...
रान काटेरी असलं तरी तिचं मन मात्र
बाळाच्या श्वासाशीच जोडलेलं...
दुपारच्या उन्हात कष्ट,
सायंकाळी उद्याचं गणित,
आणि त्या मधोमध वाढतं एक निरागस बालपण…
शहरात न दिसणारं, पण रानात जगणारं.
ही फक्त मजुरी नाही…
ही आईपणाची लढाई...
आणि उद्याच्या आशेची कहाणी आहे...
#ऊसतोड #ऊसतोड मजुर #ऊसतोड मजुरांची व्यथा नव्हे चित्त्तरकथा #अनोख्या अंदाजात ऊसतोड no 1💯 #trending #vairalpost

