ShareChat
click to see wallet page
search
#जय हरी 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 #जय राम कृष्ण हरी जय #💯✅ #👌प्रेरणादायी स्टेट्स
जय हरी 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏 - भगवंताचे दर्शन होण्यास माणसाचे अंतःकरण अतिशय पवित्र व्हावे लागते.   पवित्र अंतःकरणात पुण्य काठोकाठ भरलेले असते. अर्थात तेथे पापाला जागा उरत नाही. भगवंताकडे नेणारे कर्म ते पुण्य व भगवांतापासून दूर नेणारे कर्म ते पाप होय. तीर्थयात्रा यज्ञयाग उपवास , परोपकार इत्यादी कर्मांनी पापक्षय होतो असे शास्त्र सांगते. असेच ती कर्मे निष्काम केली तर बुद्धीने  पुण्यसंचय होतो असे म्हणतात.तथापि या कर्मांपासून इहलोकात आणि परलोकात भोग सुखे प्राप्त होतातः त्यांची गती त्यापुढे नाही. पण भगवंताचे नाम हे एकच साधन आहे की ते पापाचा क्षय करतेच पण पुण्याचा असाधारण संचय करून ते सरळ भगवंता पर्यंत नेऊन सोडते. इतर कर्मांचे फळ मिळण्यास त्यांच्यावर श्रद्धा असावी लागते. पण नामाची शक्ती विलक्षण आहे. श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने अपार पुण्यसंचय होतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे॰ भगवंताचे दर्शन होण्यास माणसाचे अंतःकरण अतिशय पवित्र व्हावे लागते.   पवित्र अंतःकरणात पुण्य काठोकाठ भरलेले असते. अर्थात तेथे पापाला जागा उरत नाही. भगवंताकडे नेणारे कर्म ते पुण्य व भगवांतापासून दूर नेणारे कर्म ते पाप होय. तीर्थयात्रा यज्ञयाग उपवास , परोपकार इत्यादी कर्मांनी पापक्षय होतो असे शास्त्र सांगते. असेच ती कर्मे निष्काम केली तर बुद्धीने  पुण्यसंचय होतो असे म्हणतात.तथापि या कर्मांपासून इहलोकात आणि परलोकात भोग सुखे प्राप्त होतातः त्यांची गती त्यापुढे नाही. पण भगवंताचे नाम हे एकच साधन आहे की ते पापाचा क्षय करतेच पण पुण्याचा असाधारण संचय करून ते सरळ भगवंता पर्यंत नेऊन सोडते. इतर कर्मांचे फळ मिळण्यास त्यांच्यावर श्रद्धा असावी लागते. पण नामाची शक्ती विलक्षण आहे. श्रद्धा असो वा नसो नामस्मरणाने अपार पुण्यसंचय होतो असा संतांचा प्रत्यक्ष अनुभव आहे॰ - ShareChat