चेक क्लिअरन्स, कॅश विड्रॉल... जे काही असेल आता थेट बुधवारी; उद्या देशभर बँकांचा संप, खाजगी बँकांचाही समावेश?
Bank Holiday 27 Jan 2026 Update: बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 27 जानेवारी रोजी देशातील बँकांचे शटर बंद राहणार आहेत. शनिवार, रविवार आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बँका आधीच बंद असताना आता मंगळवारी देशभरातील बँका बंद राहतील.