ShareChat
click to see wallet page
search
आज नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानात पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. यावेळी नाशिकच्या विकासावर आलेल्या रावणरुपी वृत्तीच्या संकटाला दूर करण्याचा निर्धार आपलं एक मत करणार आहे, त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा असे आवाहन उद्धव साहेबांनी केले. तसेच तपोवन सारख्या पावन भूमीवर राज्यकर्त्यांची पडलेली वक्रदृष्टी खोडून काढण्यासाठी सज्ज होऊया, असा निर्धार सगळ्यांसमोर व्यक्त केला. ह्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, सर्व उमेदवार तसेच शिवसैनिक, मनसैनिक उपस्थित होते. #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #💥राज ठाकरे #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🙋‍♂️उद्धव ठाकरे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩 - ShareChat