निसर्गा तुझ्या सहवासात
रमून जातो छान !
झाडी,डोंगर दऱ्यात
हरवून जाते भान..
झाडवेलीत चालते
पक्ष्यांची किलबिल !
ऐकून मनाला
पडते त्याची भूल..
कुतूहल तर जागोजागी
अनुभवास येते !
निसर्ग सहवासाची
अप्रतिम प्रचिती देते..
हिरव्या निसर्ग सौंदर्यात
असते मोठे लावण्य !
मरगळ होते दूर
मनाला लाभते चैतन्य... #kavita charoli

