ShareChat
click to see wallet page
search
🌾 शेतकऱ्याची मुलगी 🌾 मातीशी नातं माझं जन्मापासूनचं, वडिलांच्या हातात मी देव पाहिलंय रोजचं. रानात घाम गाळताना त्यांनी हसायला शिकवलं, दुःख पोटात गिळून आम्हाला स्वप्नं दिलं. सूर्य उगवायच्या आधी उठणारा बाबा, आकाशाकडे पाहून विचारणारा – आज पाऊस येईल का? त्याच्या डोळ्यात चिंता, हातात फाटलेली कुदळ, पण मनात मात्र माझ्यासाठी भविष्य उज्ज्वल. लोक म्हणतात, “शेतकरी म्हणजे गरीब”, पण त्यांनी कधी त्याचं मन पाहिलंय का? स्वतः उपाशी राहून लेकराला वाढवणारा, तो माणूस कमकुवत नाही – तो खरा योद्धा आहे. मी शेतकऱ्याची मुलगी, मला अभिमान आहे, माझ्या रक्तात मेहनत आणि स्वाभिमान आहे. आज शब्दांनी मांडते, उद्या कामाने दाखवीन, बाबांच्या घामाचं सोनं करूनच मी पुढे जाईन. समृद्धी कुंडलिक चव्हाण. #❤️I Love You #viral #follow #शेतकरी